Goa Election 2022: गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष (Goa Forward President) आणि फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई (Fatorda MLA Vijay Sardesai) यांनी भाजप विरोधी मतांची विभागणी होऊ नये असे प्रामाणिकपणे वाटत असेल तर त्यांनी स्वतःच काँग्रेसमध्ये प्रवेश करावा आणि निवडणूक लढवावी असा सल्ला काँग्रेस प्रवक्ते डॉ. आशिष कामत (Congress spokesperson Dr. Ashish Kamat) यांनी दिला.
फातोर्डातील सामाजिक कार्यकर्ते वालेरियान रॉड्रिग्स, फ्रान्सिस झेवीयर फर्नांडिस आणि नाझीरा बेगम यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमाच्यावेळी फातोर्डा हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता पण मध्यंतरी काही चुकीच्या निर्णयामुळे तो खिळखिळा झाला. या मतदारसंघात काँग्रेस कार्यकर्त्यांत पुन्हा चैतन्य निर्माण करायचे असेल, तर काँग्रेसने यावेळी कुणाशीही युती न करता फातोर्ड्यात स्वबळावर निवडणूक लढविण्याची गरज असल्याचे व्यक्त केले गेले.
जिल्हा अध्यक्ष ज्यो डायस यांनी या कार्यकर्त्यांना पक्षात प्रवेश दिला. यावेळी बोलताना 2022 मध्ये गोव्यात काँग्रेसचे सरकार आणणे हे आमचे एकमेव उद्दिष्ट असून त्यासाठी पक्षात जे कोण येऊ पाहतात त्या सर्वांना पक्षाचे दरवाजे उघडे आहेत असे त्यांनी सांगितले. यावेळी फातोर्डा गटाचे प्रभारी एव्हर्सन वालीस तसेच गट अध्यक्ष योगेश नागवेकर हे उपस्थित होते. दरम्यान याच ठिकाणी घेतलेल्या अन्य एका पत्रकार परिषदेत प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी ऐन चतुर्थीच्या सणाच्या वेळी स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरची किंमत वाढवून लोकांना या सरकारने आणखी त्रासात टाकले आहेत अशी टीका करताना हा अतिरिक्त भार गोवा सरकारने सोसून निदान चतुर्थीच्या वेळी तरी लोकांना सरकारने दिलासा द्यावा अशी मागणी केली. नॅशनल मॉनिटायझेशन पाईपलाइन प्रकल्पात गोव्यातील किती प्रकल्पावर परिमाण होणार त्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी लोकांना द्यावी अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी प्रदेश समितीचे उपाध्यक्ष एम. के. शेख हेही उपस्थित होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.