New Education Policy  Dainik Gomantak
गोवा

Goa Education: 1 एप्रिलपासून शाळा सुरु करण्याला शिक्षक संघटनेकडून हिरवा झेंडा; फोंड्यातील बैठकीत नवीन धोरणाला मंजुरी

Goa Education Policy: उच्च माध्यमिक शिक्षक संघटनेने एप्रिल महिन्याच्या सुरुवातील शैक्षणिक वर्षाची सुरुवात करण्याच्या निर्णयाला संमती दर्शवली आहे

Akshata Chhatre

फोंडा: नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात १ एप्रिल पासून होणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार एप्रिल महिन्याच्या सुरुवातील शैक्षणिक वर्षाची सुरुवात करण्याचा निर्णय गोवा शिक्षण खात्याने घेतला आहे, आणि उच्च माध्यमिक शिक्षक संघटनेने याला संमती दर्शवली आहे. फोंडा येथे १६ फेब्रुवारी रोजी झालेल्या एका सभेत संघटनेने या निर्णयाला संमती दर्शवली आहे.

आत्तापर्यंत गोव्यात जून महिन्यात नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात केली जायची, मात्र आता नवीन धोरणानुसार १ एप्रिल हा शाळेचा पहिला दिवस असणार आहे. हा निर्णय राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय शिक्षा प्रणालींशी जुळणारा आहे.

यामुळे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी करणं सोपं जाईल असं शिक्षक संघटनेचं म्हणणं आहे. विद्यार्थ्यांसाठी तणावमुक्त वातावरण निर्माण व्हावं आणि अनुकूल शैक्षणिक पद्धतीला प्रोत्साहन मिळावं हा नवीन शैक्षणिक धोरणाचा प्रमुख उद्देश आहे. या नवीन प्रणालीचा अवलंब केल्याने सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये सुसंगती आणि एकरूपता येईल.

समोर आलेल्या माहितीनुसार इयत्ता नववीपर्यंतचे निकाल शाळांना २९ एप्रिल पर्यंत जाहीर करावे लागणार असल्याचं शिक्षण खात्याचे संचालक शैलेश झिंगडे म्हणाले आहेत. नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात निकालांच्या आगोदर जरी झाली तरीही त्यामुळे काहीही समस्या निर्माण होणार नाही, कारण सध्या गोव्यात इयत्ता आठवीपर्यंत पास करण्याचे धोरण लागू केलं गेलंय आणि नववीत नापास झाल्यास पुन्हा परीक्षा देण्याची सवलत दिली जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT