SET Exam 2025 Dainik Gomantak
गोवा

Goa Education: 'सहाय्यक प्राध्यापक बनायचंय? तयारीला लागा'; पुणे विद्यापीठाकडून 'SET' परीक्षेच्या तारखा जाहीर

SET Exam Dates: साहाय्यक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) परीक्षा यंदाच्या वर्षी रविवार (दि. १५) जून रोजी घेतली जाणार आहे

Akshata Chhatre

पणजी: साहाय्यक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) परीक्षा यंदाच्या वर्षी रविवार (दि. १५) जून रोजी घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी २४ फेब्रुवारीपासून १३ मार्चपर्यंत अर्ज करता येणार आहेत, असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव तथा सदस्य सचिव (सेट) प्रा. ज्योती भाकरे यांनी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.

महाराष्ट्र आणि गोवा राज्यासाठी ‘सेट’ परीक्षा आयोजनासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाची नोडल एजन्सी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी वरील कालावधीत अर्ज भरला नसल्यास अतिरिक्त शुल्क भरून १४ मार्च रोजी सकाळी ११ वाजल्यापासून २१ मार्च रोजी सायंकाळी ६ वा.पर्यंत अर्ज भरता येईल. परंतु जर एखादा उमेदवार आधीच एखाद्या विषयात ‘सेट’ परीक्षा उत्तीर्ण (पात्र) असेल तर त्याला परत त्याच विषयात ‘सेट’ परीक्षा देता येणार नाही.

‘ओएमआर’ पद्धतीने परीक्षा

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचनेप्रमाणे आतापर्यंत ३९ ‘सेट’ परीक्षांचे आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पारंपरिक ‘ओएमआर’ पद्धतीने करण्यात आले. ४०व्या परीक्षेचे आयोजनही त्याच पद्धतीने करण्यात येणार आहे.

यापूर्वी यंदाची ‘सेट’ परीक्षा ही संगणीकृत पद्धतीने घेण्यात येणार असल्याचे परिपत्रक काढण्यात आले होते; परंतु ते परिपत्रक रद्द करून पारंपरिक ‘ओएमआर’ पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे.

राज्यस्तरीय पात्रता परीक्षा का द्यावी?

राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET) महाराष्ट्र आणि गोव्यातील इच्छुक शिक्षक आणि संशोधकांसाठी महत्वाची आहे. या राज्यांमधील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापक बनू इच्छिणाऱ्यांसाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. ही परीक्षा विषयाचे ज्ञान आणि अध्यापन क्षमतेचे कठोर मूल्यांकन करते. शिक्षणाव्यतिरिक्त, ही परीक्षा उत्तीर्ण झाल्याने संशोधनाच्या संधी आणि इतर संबंधित करिअरचे मार्ग देखील खुले होतात. राज्यस्तरीय पात्रता परीक्षा उच्च शिक्षण आणि संशोधनात करिअर घडवण्यासाठी प्रवेशद्वार म्हणून कार्य करते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT