Goa Education: शैक्षणिक पुस्तके एप्रिलमध्ये पुरवणार! मराठी, कोकणीची पूर्णतः नवी पाठ्यपुस्तके येणार; SCERT तर्फे माहिती

Goa School Books: पुढील वर्षी एनसीईआरटी आणि स्थानिक अभ्यासक्रम एकत्रितपणे पुस्तक काढण्यात येणार आहेत. भाषेची पुस्तके पूर्णतः नवी बनविण्यात येत आहेत.
Goa Education News
Goa School Books Availability Canva
Published on
Updated on

New Education Policy Goa

पणजी: राज्यात मागील दोन वर्षांपासून नवीन शिक्षण धोरणाची अंमलबजावणी झाली असून पहिलीपासून आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी एनईपीनुसार नवीन पाठ्यपुस्तक निर्मिती गोवा राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेद्वारे बनविण्यात येत असून इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची एनईपी अभ्यासक्रमाची नवी पाठ्यपुस्तके एप्रिलमध्येच पुरविण्यात येणार असल्याचे एससीईआरटीच्या संचालक मेघना शेटगावकर यांनी सांगितले.

शेटगावंकर म्हणाल्या, पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष हे जूनमध्ये सुरू होणार आहे. त्यामुळे त्यांना जूनमध्ये पाठ्यपुस्तके त्यांना पुरविण्यात येणार आहे. इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना एनसीआरटीची पुस्तके वापरण्यात येतात. परंतु त्यात २० टक्के त्या विषयाशी संबंधित प्रादेशिक माहिती, अभ्यास समाविष्ट केला जातो.

परंतु यंदा एनसीआरटीची आणि स्थानिक अभ्यासाची अशी वेगळी पुस्तके देण्यात येणार आहेत, कारण आम्हाला जर स्थानिक अभ्यासात काही बदल करायचा असेल तर त्यात करून नंतर पुढील वर्षी एनसीईआरटी आणि स्थानिक अभ्यासक्रम एकत्रितपणे पुस्तक काढण्यात येणार आहेत. मराठी आणि कोकणी भाषेची पुस्तके पुस्तके पूर्णतः नवी बनविण्यात येत आहेत.

इयत्ता नववी आणि दहावीला यंदा एप्रिलमध्ये शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. त्यामुळे सर्व तयारी पूर्ण असून नववी-दहावीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये बदल केला नसल्याने सर्व पुस्तके उपलब्ध आहेत. पुस्तकांचा पुरवठा करण्यास देखील सुरुवात करण्यात आली आहे अजून तरी कुठे पुरवठ्यात कमतरता आली नाही त्यामुळे नववी दहावीला वेळेत पुस्तके मिळतील.

भगीरथ शेट्ये, अध्यक्ष, गोवा शिक्षण मंडळ.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com