Goa Education Dainik Gomantak
गोवा

Goa Education: शिक्षण क्षेत्रात क्रांती! पहिली-दुसरीच्या विद्यार्थ्यांचं 'निपुण' चाचणीद्वारे मूल्यमापन होणार

Nipun Test Goa: पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांचे गणित आणि इंग्रजी या विषयांमध्ये कृत्रिम प्रज्ञा चालित 'निपुण' चाचणीद्वारे मूल्यमापन सुरु करण्यात आले आहे.

Sameer Amunekar

पणजी: पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांचे गणित आणि इंग्रजी या विषयांमध्ये कृत्रिम प्रज्ञा चालित 'निपुण' चाचणीद्वारे मूल्यमापन सुरु करण्यात आले आहे. शैक्षणिक सत्र संपत आलेले असतानाच हा उपक्रम राबवला जात आहे.

राज्यातील सरकारी प्राथमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांचे शिक्षण परिणाम मोजण्यासाठी निपुण चाचणी १७ फेब्रुवारीपासून घेतली जात आहे. चाचणी १ मार्चपर्यंत चालेल. विद्यार्थ्यांचे सर्वंकष मूल्यमापन करून भविष्यातील शैक्षणिक धोरणे ठरवण्यास ही चाचणी मदत करेल.

समग्र शिक्षा गोवा यांच्या वतीने, विद्या समिक्षा केंद्र आणि निपुण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने, राज्य शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि कॉनव्हेजिनीयस यांच्या सहकार्याने कृत्रिम प्रज्ञेवर आधारित निपुण मूल्यमापन सुरू करण्यात आले आहे.

स्वीफ्टचॅटवर आधारित निपुण गोवा चॅटबॉटमध्ये गणित आणि इंग्रजीसाठी प्रत्येकी २० कृत्रिम प्रज्ञा चालित प्रश्न आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Murder Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

Shukra Gochar: धन अन् ऐश्वर्याचा कारक शुक्र बदलणार चाल! 4 राशींचे सुखाचे दिवस संपून आव्हानांचा काळ सुरु; आर्थिक बजेट बिघडणार

Goa Water Metro Project: पर्यावरणपूरक बोटी अन् सुरक्षित जलप्रवास! CM सावंत यांच्या 'गोवा वॉटर मेट्रो' प्रस्तावाला केंद्र सरकारची मंजुरी

खरी कुजबूज: ...आणि युरीचे दोन्ही समर्थक खुश झाले

SCROLL FOR NEXT