Goa Education Dainik Gomantak
गोवा

Goa Education: "शिक्षण महत्त्वाचं, पण आरोग्य प्रथम! उष्म्यामुळे शैक्षणिक वर्ग पुढे ढकला", केतन भाटीकरांचं सरकारला साकडं

Goa Education News: राज्यात उष्मा प्रचंड प्रमाणात वाढला असताना सरकारकडून आता एप्रिलमध्ये शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचे जाहीर करण्यात आल्याने एकप्रकारे हा मुलांवर अन्याय केल्यासारखे होणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

फोंडा : राज्यात उष्मा प्रचंड प्रमाणात वाढला असताना सरकारकडून आता एप्रिलमध्ये शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचे जाहीर करण्यात आल्याने एकप्रकारे हा मुलांवर अन्याय केल्यासारखे होणार आहे. एक महिन्यानंतर हे शैक्षणिक वर्ष सुरू करणे संयुक्तिक ठरेल, असे मगो पक्षाचे नेते तथा रायझिंग फोंड्याचे डॉ. केतन भाटीकर यांनी सांगितले.

फोंड्यात काही पालकांसमवेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केतन भाटीकर बोलत होते. सध्या उष्मा प्रचंड प्रमाणात वाढला आहे.

वाढत्या उष्म्यामुळे मुलांच्या आरोग्याच्यादृष्टीने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी एका महिन्यानंतर तरी हे शैक्षणिक वर्ष सुरू करावे. विद्यमान स्थितीत आपल्याकडे ‘एसी’चे वर्ग नाहीत, त्यामुळे वाढत्या उकाड्यामुळे मुले हैराण होण्याची शक्यता आहे, असे भाटीकर म्हणाले.

मुलांना थोडा वेळ हवा!

मुलांना परीक्षा संपल्यानंतर ‘रिलॅक्स’ होण्याची आवश्‍यकता असते; पण परीक्षेनंतर लगेच वर्ग सुरू केले तर त्यांच्या मानसिकतेतही बदल होण्याची भीती असते, म्हणून सरकारने हा निर्णय मागे घ्यावा. सरकारच्या शैक्षणिक धोरणाला आमचा विरोध नाही.

सरकारकडून चांगले काम सुरू आहे; पण उन्हाळ्याचा विचार करून शैक्षणिक वर्षाचा विचार व्हावा, असे काही पालकांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT