Goa Education Dainik Gomantak
गोवा

Goa Education: एकशिक्षकी शाळांचा प्रश्न सुटणार; सरकारी शाळांना अतिरिक्त शिक्षक पुरविले जाणार, CM सावंतांची घोषणा

teacher recruitment in Goa schools: राज्यातील सरकारी व अनुदानित शाळांना आवश्यकतेनुसार शिक्षक पुरविले जाणार आहेत.

Sameer Amunekar

पणजी: राज्यातील सरकारी व अनुदानित शाळांना आवश्यकतेनुसार शिक्षक पुरविले जाणार आहेत. आता कोणतीही शाळा एका शिक्षकावर चालवली जाणार नाही. सरकारने या एकशिक्षकी शाळांना अतिरिक्त शिक्षक पुरवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शिक्षक दिनाचे औचित्य साधून दिली.

कला अकादमीतील दीनानाथ मंगेशकर सभागृहात शुक्रवारी शिक्षण संचालनालयातर्फे आयोजित कार्यक्रमात शिक्षकांना मुख्‍यमंत्री सावंत यांच्‍या हस्‍ते ‘मुख्यमंत्री वशिष्‍ठ गुरू पुरस्‍कार’ देऊन गौरविण्यात आले.

याप्रसंगी व्यासपीठावर शिक्षण संचालक प्रसाद लोलयेकर, शिक्षण संचालक शैलेश झिंगडे, गोवा ‘एससीईआरटी’च्या संचालक मेघना शेटगावकर, ‘समग्र शिक्षा’चे शंभू घाडी आणि मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, आम्ही गेल्या सहा वर्षांत कोणालाही पुरस्कार देण्यासाठी सूचित केलेले नाही. या पुरस्कारांसाठी ज्यांची निवड झाली, त्यासाठी निवड समिती काम करते.

‘माझी लॅब-बरी लॅब’ पुरस्कार

मुख्यमंत्री म्हणाले, ‘माझी लॅब-बरी लॅब’ असा पुरस्कार यापूर्वी कधीच दिला गेला नाही. यंदा उत्तर आणि दक्षिण गोव्यात दोन पुरस्कार देण्यात आले. ३ व २ लाखांचे हे पुरस्कार असून, शिक्षक आपली लॅब सुस्थितीत ठेवतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

शिक्षक दिनाचे औचित्य साधून जो निधी संकलीत केला जातो, त्यासाठी ज्यांनी सहकार्य केले, त्यांचाही उल्लेख मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT