Western Zonal Council meeting Gandhinagar, Gujarat: मोपा येथे कार्यान्वित झालेल्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे राज्यात डबल आर्थिक वाढ अपेक्षित आहे. तसेच, या विमानतळामुळे पर्यटनाला चालना मिळेल. असे वक्तव्य गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले.
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली गांधीनगर, गुजरात येथे सोमवारी (दि.28) पश्चिम क्षेत्रीय परिषदेची 26 वी बैठक पार पडली. गृह मंत्रालयाच्या आंतरराज्यीय परिषद सचिवालयाच्या वतीने आयोजित या बैठकीत सावंत बोलत होते.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, गुजरात येथील पश्चिम विभागीय परिषदेच्या बैठकीला मुख्यमंत्री सावंत यांनी संबोधित केले. कोरोना काळात राज्य सरकारने केलेल्या उपाययोजना आणि प्रतिबंध यामुळे गोव्याच्या अर्थव्यवस्थेला कोणताही मोठा धक्का बसला नाही.
नव्याने उभारण्यात आलेल्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे राज्यात डबल आर्थिक प्रगती अपेक्षित आहे. असे मत मुख्यमंत्री सावंत यांनी यावेळी मांडले.
NITI आयोगाने जारी केलेल्या शाश्वत विकास उद्दिष्टे (SDG) इंडिया इंडेक्स रिपोर्ट 3.0 मध्ये राज्याला 72 गुणांसह चौथे स्थान प्राप्त करता आले.
'SDG 6 - स्वच्छ पाणी आणि स्वच्छता - आणि SDG 7 - परवडणारी आणि स्वच्छ ऊर्जा या दोन उद्दिष्टांमध्ये 100 टक्के गुण मिळवणारे गोवा देशातील एकमेव राज्य आहे. भाजपशासित राज्याने शाश्वत विकास उद्दिष्टांवर लक्ष ठेवण्यासाठी नोडल विभागांशी सल्लामसलत करून प्रत्येक SDG अंतर्गत स्वतःचे सूचक फ्रेमवर्क विकसित केले आहे.' असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.
2022-23 (अग्रिम) वर्षासाठी गोव्याचे सकल राज्य देशांतर्गत उत्पादन (GSDP) 90641.86 कोटी रुपये होईल असा अंदाज आहे. असेही सावंत म्हणाले. 2022-23 या वर्षासाठी गोव्याचा दरडोई जीएसडीपी 5.75 लाख रुपये आहे, जो एक मजबूत आणि निरोगी अर्थव्यवस्थेचे प्रतिक आहे. असेही सावंत म्हणाले.
प्रवास आणि पर्यटनावर गोव्याची अर्थव्यवस्था अवलंबून आहे पण, राज्य सरकारच्या स्मार्ट उपक्रमांमुळे कोरोना साथीच्या काळात त्याला कोणताही मोठा धक्का बसला नाही. असे सावंत यांनी स्पष्ट केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.