Goa Economic Survey 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Economic Survey 2023: राज्याचा विकासदर 10.33 टक्के राहणार; आर्थिक पाहणी अहवालातील अंदाज

मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ राज्याच्या विकासात पार पाडणार महत्वाची भूमिका

Akshay Nirmale

Goa Economic Survey 2023: मोपा येथे बांधलेल्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे गोव्याची अर्थव्यवस्था वाढीसाठी अनुकूल स्थितीत आहे.

आगामी 2023-24 या आर्थिक वर्षात गोव्याच्या अर्थव्यवस्थेत 10.33 टक्के वाढ अपेक्षित आहे, असे राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात म्हटले आहे. मंगळवारी विधानसभेत हा अहवाल सादर करण्यात आला.

या वाढीमध्ये मोपा येथील विमानतळासह राज्य सरकारची विविध धोरणे कारणीभूत असणार आहेत. त्यामध्ये उच्च शिक्षणासाठी विविध शैक्षणिक संस्थांची उभारणी, राज्याचे पर्यटन धोरण, राज्यातील खाणी या क्षेत्रांचा प्रामुख्याने मोठा सहभाग राहिल, असे या आर्थिक पाहणी अहवालात म्हटले आहे.

गोव्याचे दरडोई उत्पन्न 2021-22 या वर्षात 5,27,146 रुपये झाले आहे. 2017-18 मध्ये ते 4,54,172 रुपये होते तर 2020-21 मध्ये 4,86,851 रुपये असे वाढले होते.

दरम्यान, गोवा-IPB ने एप्रिल 2022 ते जानेवारी 2023 या काळात 11 नवीन औद्योगिक प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. या उपक्रमांमधून एकूण 1187.95 कोटी गुंतवणूक अपेक्षित आहे आणि 4697 लोकांना रोजगार मिळणार आहे, असेही अहवालात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT