Vasco Drugs Case Dainik Gomantak
गोवा

Vasco Drugs Case: कांदोळी, हणजूण पाठोपाठ वास्कोत छापोमारी; परप्रांतियाकडून साठ हजाराहून अधिक रकमेचा गांजा जप्त

Vasco Drugs Case: गोव्यात अमली पदार्थ विक्रीविरोधात पोलिसांची कारवाई

Ganeshprasad Gogate

Vasco Drugs Case: गोव्यात अवैध पदार्थ बाळगल्या प्रकरणी पोलीस कारवाई करत दिवसेंदिवस अशा प्रकरणामध्ये वाढ होत आहे.

काल म्हणजेच मंगळवारी सकाळी पोलिसांनी सिकेरी-कांदोळी या भागात ग्राहकांना गांजा विकण्यासाठी आलेल्या तरुणाला ताब्यात घेतले होते.

ही घटना होते न होते तोच पोलिसांनी उत्तर गोव्यातील हणजूण येथे गांजा विकण्यासाठी आलेल्या ओडिसातील तरुणाला सापळा रचत ताब्यात घेतले होते.

या घटनेनंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी वास्को येथे पोलिसांनी उत्तर प्रदेशमधील एकावर कारवाई केलीय. कुतुबुद्दीन अब्बास अली अन्सारी (वय 30) असे या तरुणाचे नाव असून तो उत्तर प्रदेशमधील असल्याचे समजतेय. या कारवाईवेळी वास्को पोलिसांनी त्याच्याकडून 68,500 रुपयांचा माल जप्त केलाय.

गोव्यात कोकेन, गांजा यासारख्या अमली पदार्थांच्या विक्रीवर पोलिसांचे छापेमारीचे सत्र सुरु असून या घटनांसोबतच गुन्हेगारी घटनाही दिवसेंदिवस वाढत आहेत.

गोव्यात दररोज येणाऱ्या पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे राज्यात गुन्हेगारीचे सत्रही वाढत आहे. घडणाऱ्या घटनांमध्ये स्थानिकांपेक्षा परप्रांतीयांचाच हात असल्याचे उघड झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

SIR Allegation: 'मतदारांची नावे रद्द करणे हे कटकारस्थान'; सरदेसाईंचा आरोप, दवंडेतील एकाच कुटुंबातील सहा नावे वगळल्याचे उघड

Abhinav Tejarana Captaincy: स्नेहलनंतर अभिनवकडे गोव्याच्या रणजी संघाची धुरा? 7 सामन्यांत 788 धावांचा पाऊस; कर्णधारपदासाठी तेजराणा आघाडीवर

America Visa: भारतीय आयटी प्रोफेशनल्ससाठी महत्त्वाची अपडेट! H-1B व्हिसा नियम मोडणाऱ्या कंपन्यांना 2.4 कोटींच्या दंडासह 10 वर्षांचा बॅन; नव्या विधेयकाने खळबळ

Goa Agriculture: डिचोलीत बळीराजाच्या नजरा आभाळाकडे! भातपीक कणसे धरण्याच्या टप्प्यावर, दमदार पाऊस गायब; हातातोंडाशी आलेला घास करपण्याची भीती

Electricity Tariff Hike: 1 नोव्हेंबरपासून उद्योगांची वीज महागणार! सौर-ऑफपीक वेळेत 80 पैसे, पीक अवरमध्ये 2 रुपये अतिरिक्त

SCROLL FOR NEXT