Goa Drowning Death Dainik Gomantak
गोवा

Goa Drowning Death: 'मी खेळायला जातो...' शब्द अखेरचे ठरले! धारबांदोडा येथेे दहावीतील विद्यार्थ्याचा मृत्यू; दुसऱ्या मित्राला वाचवण्यात यश

Goa Drowning Death In Ponda: आपण खेळण्यासाठी जात असल्याचे सांगून घराबाहेर पडलेल्या देवांश सीताराम चंदवाडकर (वय १५) या विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याचे पोलिस चाैकशीनंतर स्पष्ट झाले आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

फोंडा: आपण खेळण्यासाठी जात असल्याचे सांगून घराबाहेर पडलेल्या देवांश सीताराम चंदवाडकर (वय १५) या विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याचे पोलिस चाैकशीनंतर स्पष्ट झाले आहे. धडे-धारबांदोडा येथील दूधसागर नदीवर तो मित्रांसोबत आंघोळीसाठी गेला होता. मात्र देवांशने आपण आंघोळीसाठी जात असल्याचे पालकांना सांगितले नव्हते, त्याच्यासोबत गेलेल्या अन्य एकाला वाचविण्यात त्याच्या मित्रांना यश आले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मंगळवारी संध्याकाळी फोंडा येथील क्रीडा संकुलनात खेळण्यासाठी जात असल्याचे सांगून देवांश चंदवाडकर हा आपल्या मित्रांना घेऊन धडे येथील दूधसागर नदीवर गेला. आंघोळ करताना देवांश पाण्यात बुडू लागल्याने अन्य विद्यार्थ्यांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही. मित्रांना दुसऱ्या मित्राला वाचवण्यात यश आले.

देवांश बुडाल्यानंतर चारही जणांनी एकाच स्कूटरवरून फोंडा येथील आपले घर गाठले. मात्र देवांश बुडाल्याची माहिती त्यांनी कुणालाच दिली नाही. मंगळवारी रात्री देवांश घरी परतला नसल्याची माहिती मिळाल्यानंतर पालकांनी फोंडा येथील क्रीडा संकुलनात जाऊन विचारपूस केली.

त्यावेळी क्रीडा संकुलनात देवांश हा आला नव्हता, असे त्यांना कळाले. त्यानंतर पालकांनी देवांश बेपत्ता झाल्याची तक्रार फोंडा पोलीस स्थानकात नोंदवली. त्यानुसार, फोंडा पोलीस स्थानकाचे निरीक्षक विजयनाथ कवळेकर यांनी अन्य चार विद्यार्थ्यांची विचारपूस केली. त्यातून देवांश हा नदीत बुडाल्याचे समोर आले.

मृतदेहाचा शोध सुरूच

मंगळवारीे रात्रीची वेळ झाल्याने शोध कामाला सुरुवात केली गेली नव्हती. पण, बुधवारी सकाळपासून फोंडा अग्निशामक दलाचे कर्मचारी तसेच फोंडा पोलीस आणि परिसरात शोध घेत होते. मात्र त्यांना देवांशचा मृतदेह सापडला नाही. ज्या ठिकाणी ही घटना घडली ते स्थळ प्रतापनगर गावापासून अंदाजे ३-४ किलोमीटर अंतरावर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Budh Guru Yuti 2026: 15 ऑगस्टला घडणार महासंयोग! 'या' 5 भाग्यवान राशींना मिळणार मोठी गुड न्यूज; होणार तगडा धनलाभ

Goa Culture: काकडीचं धार्मिक महत्त्व; गोमंतकीय संस्कृती, लोकपरंपरा आणि आरोग्याशी जोडलेला 3000 वर्षांचा रंजक इतिहास

खरी कुजबूज: गेले नगरसेवक कुणीकडे?

Bangkok School Shooting: शाळेत अंदाधुंद गोळीबार; विद्यार्थ्यानं शिक्षकाची हत्या करून स्वतःवरही झाडली गोळी, 15 विद्यार्थी जखमी VIDEO

VIDEO: भन्नाट! विल जॅक्स बनला 'सुपरमॅन'! सीमारेषेवर घेतला अफलातून झेल, व्हिडीओ पाहाल तर तुम्हीही हैराण व्हाल...

SCROLL FOR NEXT