Drowning Accidents  Dainik Goma
गोवा

Goa Drowning Accidents : चिंतेची बाब; गोव्‍यात दर चौथ्‍या दिवशी एकाचा बुडून मृत्‍यू

गोमन्तक डिजिटल टीम

सुशांत कुंकळयेकर

Goa Drowning Accidents : गोव्‍याची गणना शांत व सुरक्षित राज्‍यात होत असली तरी राज्‍यात दरवर्षी सरासरी १००-१२५ जणांच्या बुडून मृत्‍यूच्‍या घटना घडतात. दर चौथ्‍या दिवशी एका जलसमाधीची नाेंद होत आहे. या बाबतीत तीव्र चिंता वर्तवण्‍यात येत असून हे मृत्‍यू कमी कसे करावेत यासाठी राज्‍यातील महत्‍वाच्‍या खात्‍यांनी एकत्र येऊन एक आराखडा तयार करण्‍याची गरज व्‍यक्‍त केली जात आहे.

उद्याचा २५ जुलै हा जागतिक जलसमाधी प्रतिबंध दिवस म्‍हणून साजरा केला जात असून त्‍या निमित्ताने गोव्‍यातील हे बुडून मरणाऱ्यांचे प्रमाण शून्‍यावर आणण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी एकत्रित प्रयत्‍न करण्‍याची गरज आहे.

चालू महिन्‍यात धबधब्‍यावर आणि अन्‍य ठिकाणी बुडणाऱ्यांची संख्‍या आतापर्यंत दहावर गेली असून याच पार्श्‍वभूमीवर ही मागणी होत आहे. फक्‍त पर्यटकांमध्‍येच नव्‍हे तर राज्‍यातील विद्यार्थी, युवक आणि इतर नागरिकांत जागृतीची गरज ‘गोवा कॅन’ ने व्‍यक्‍त केली आहे.

बुडून मृत्‍यू येेणे हे जगातील अपघाती मृत्‍यूचे माेठे कारण असून दरवर्षी सरासरी २.३६ लाख लोकांना बुडून मृत्‍यू येताे. गेल्या दहा वर्षांत २.५ दशलक्ष लोकांना बुडून मृत्‍यू आला.

यातील ९० टक्‍के मृत्‍यू विकसनशील देशांतील असल्‍याचे उघड झाले आहे. २०२० पासून ‘गोवा कॅन’ हे मृत्‍यू कमी व्‍हावेत यासाठी प्रयत्‍न करत असून यंदाही या दिनाचे निमित्त साधून जागृती माेहीम हाती घेतली आहे.

६ वर्षात ११८ मृत्‍यूंची नोंद

गोवा हे जागतिक पर्यटन क्षेत्र असून पर्यटकांना बुडून येणारे मृत्‍यू ही चिंतेची बाब आहे. गोवा विधानसभा अधिवेशनात पर्यटनमंत्री रोहन खवंटे यांनी दिलेल्‍या माहितीप्रमाणे मागच्‍या सहा वर्षात गोव्‍यात ११८ पर्यटकांना बुडून मृत्‍यू आला आहे.

त्‍यात समुद्रावर स्‍नान करण्‍याबरोबरच विविध ठिकाणचे धबधबे आणि विविध हॉटेल्‍सचे स्‍विमिंगपूल यात बुडून मरण्‍याच्‍या घटनांची नोंद आहे. या वर्षीही एकूण १३ पर्यटकांका बुडून मृत्‍यू आला आहे.

हे उपाय शक्‍य

  • शालेय विद्यार्थ्यांना जलतरण व बचाव प्रशिक्षण देता येणे शक्‍य

  • धधबे,पुराच्या पाण्‍यात जाता येऊ नये, यासाठी बॅरिकेड्‌स हवेत.

  • जलक्रीडा प्रकार नियंत्रणासाठी कायद्याची गरज.

  • जिल्‍ह्यातील पूर व्‍यवस्थापन सक्षम करण्‍याची गरज.

  • खुल्‍या विहिरी, खंदकाच्या ठिकाणी सुरक्षा उपाय हवेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT