Uber In Goa : गोव्यात टॅक्सी सेवा सुरु करणाऱ्या 'उबर'विरोधात तक्रार दाखल

माहिती-तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत कायदेशीर कारवाई करण्याची मागणी
Uber
UberDainik Gomantak
Published on
Updated on

Complaint filed against 'Uber' : मोपा विमानतळावरून प्रवाशांना निश्चीत स्थळी टॅक्सीने सोडण्याचे काम उबर करणार असल्याची पोस्ट शनिवारी चर्चेचा विषय ठरली होती. दरम्यान, वाहतूक खात्याने अशा कोणत्याही सेवेला परवानगी दिलेली नाही. याविषयी सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार करणार असल्याचे वाहतूक संचालक राजन सातार्डेकर यांनी सांगितले होते.

Uber
Tillari Dam : तिलारीतून विसर्ग सुरु; उत्तर गोव्याला पूराचा धोका नाही

दरम्यान आज सोमवारी उबर कंपनीविरोधात वाहतूक खात्याने गोवा पोलिसांच्या रायबंदर येथील सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. यावेळी उबर कंपनीची गोव्यातील सेवा ‘ब्लॉक’ करण्याची तसेच माहिती-तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

अॅप आधारित टॅक्सी सेवा देणाऱ्या उबर कंपनीने गोव्यात सेवा सुरु केली. पहिल्या टप्प्यात केवळ विमानतळावरून प्रवाशांना ने-आण करण्यासाठी कंपनीने ही सेवा सुरू केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Crime Highest
Bangladeshi Dacoit Gang Goa
Bangladeshi dacoit gang Goa
Goa Police crime branch investigation news
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com