Court Dainik Gomantak
गोवा

Goa: बेड्या घालून न्यायालयात आणू नये यासाठी केला अर्ज

आरोपी मडगाव न्यायालयातून (Court) पळून गेल्यानंतर गुन्ह्यातील (Crime) संशयितांना बेड्या घालून कोर्टात आणण्याची पोलिसांची (Police) मागणी होती.

दैनिक गोमन्तक

मडगाव: आयरिश युवतीच्या हत्या प्रकरणी काणकोण पोलिसांनी (Police) अटक केलेल्या विकट भगत याला न्यायालयात सुनावणीस हजर करताना बेड्या घालू नयेत असा आदेश मडगावच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश (Sessions Judge) द्विजपल पाटकर यांनी आज दिला.

एका वर्षांपूर्वी पोलिसांनी त्याला न्यायालयात आणताना बेड्या घालून आणण्याची कोर्टाकडून (Court) परवानगी मिळविली होती तेव्हापासून त्याला बेड्या घालूनच कोर्टात आणले जात होते. आपल्याला बेड्या घालून न्यायालयात आणू नये यासाठी त्याने अर्ज केला होता.

तीन वर्षांपूर्वी काणकोण येथे एका आयरिश युवतीवर बलात्कार करून नंतर तिचा खून करण्याच्या आरोपाखाली भगत याला पोलिसांनी (Police) अटक केली होती. सध्या त्याच्या विरुद्ध सुनावणी चालू आहे.

मध्यंतरीच्या काळात आणखी एका बलात्कार प्रकरणातील आरोपी (Accused) मडगाव न्यायालयातून पळून गेल्यानंतर सर्व गंभीर गुन्ह्यातील संशयितांना बेड्या घालून कोर्टात आणण्याची पोलिसांची मागणी मान्य करण्यात आली होती. त्यात विकट भगत यालाही हातात बेड्या घालून कोर्टात आणले जात होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

‘ही अतिशय दुर्दैवी स्थिती', सेवानिवृत्तांना मुदतवाढ देण्याच्या प्रथेबद्दल कोर्टाचे ताशेरे; यंत्रणेचे मनोबल खच्ची केल्याचा ठपका

Lotulim Shipyard Blast: लोटली येथे शिपयार्डमध्ये आगीमुळे मोठा स्फोट; 2 कामगारांचा होरपळून मृत्यू; 4 जखमी

Yusuf Pathan Post Controversy: 'आदिनाथ मंदिर की आदिना मशीद'? युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा आक्षेप; सोशल मीडियावर फुटले नव्या वादाला तोंड

Viral Video: पाण्याच्या बाटलीवरून 'महाभारत'! निजामुद्दीन स्टेशनवर विक्रेत्यांमध्ये तुफान हाणामारी; रेल्वेनं ठोठावला 5 लाखांचा दंड

Virat Kohli: किंग कोहलीला दिसला वर्ल्ड कप फायनलचा 'फ्लॅशबॅक'; ऑस्ट्रेलियात सरावादरम्यान चाहत्यांची धडधड वाढली, पाहा VIDEO!

SCROLL FOR NEXT