Shooting At Dongari Tiswadi  Dainik Gomantak
गोवा

Shooting At Dongri Tiswadi: धक्कादायक घटना! मंडूर येथे अंत्यसंस्कारावेळी गोळीबार, राज्यात स्मशानभूमीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

पोलिसांकडून वृद्धास अटक; पिस्तूल जप्त; गावात भीतीयुक्त तणाव

गोमन्तक डिजिटल टीम

Shooting At Dongri Tiswadi सांतआंद्रे मतदारसंघातील मंडूर येथे आज सकाळी स्मशानभूमीत अंत्यसंस्कारावेळी वाद होऊन गोळीबार होण्याची धक्कादायक घटना घडली. अंत्यसंस्काराच्या तयारीसाठी गावकरी स्मशानभूमीत साफसफाई करण्यासाठी गेले असता, तेथे जमीनमालक पीटर वाझ (वय 71) आणि वेंगुर्लेकर कुटुंबीय यांच्यात वाद झाल्यानंतर त्याचे रूपांतर गोळीबारात झाले.

याप्रकरणी आगशी पोलिसांनी पीटर वाझ याला ताब्यात घेऊन नंतर अटक केली. तसेच गोळीबारात वापरलेले पिस्तूल जप्त केले असल्याची माहिती आगशी पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक रमेश हरिजन करत आहेत.

मंडूर येथील सायकल दुरुस्त करणारे गणपत ऊर्फ गणा वेंगुर्लेकर यांचे आज पहाटे निधन झाल्यानंतर, त्यांचे दोन पुतणे श्याम व सुशांत वेंगुर्लेकर आणि गावकऱ्यांनी अंत्यसंस्कार करण्यासाठी मंडूर येथील स्मशानभूमीत साफसफाईचे काम सुरू केले.

यावेळी पीटर वाझ याने घटनास्थळी येऊन अंत्यसंस्कार करण्यास मज्जाव केला. यावरून वाझ आणि गावकऱ्यांमध्ये जोरदार भांडण झाले.

ही जमीन आपली असून येथे आपण अंत्यसंस्काराला परवानगी देणार नसल्याचे वाझ याने सांगितले. नंतर या भांडणाचे रूपांतर गोळीबारात झाले. त्यात श्याम वेंगुर्लेकर थोडक्यात बचावले.

दरम्यान, या स्मशानभूमीसंदर्भातचा खटला २०१५ पासून सुरू आहे. जमीनमालक पीटर वाझ याने आपल्या जागेत अंत्यसंस्काराला आक्षेप घेतला होता.

तेव्हापासून हा वाद सुरू झाला, परंतु आमच्या वाडवडिलांचे येथेच अंत्यसंस्कार करण्यात येत असून येथेच आम्ही अंत्यसंस्कार करणार असल्यावर ग्रामस्थ ठाम असल्याने हा वाद चिघळला आहे.

घटनेची माहिती मिळताच आगशी पोलिसांनी घटनास्थळी येऊन पीटर वाझ याला ताब्यात घेतले. गोळीबारात वापरलेले पिस्तूल आणि दोन राऊंड देखील पोलिसांनी जप्त केले. या घटनेमुळे आजोशी पंचायतीत तणाव निर्माण झाला.

गोळी झाडल्यानंतर पीटरने घटनास्थळावरून दुचाकीवरून पळ काढला. त्यानंतर अटकपूर्व जामिनासाठी वाझ याने धावाधाव केली, परंतु अखेर पोलिसांनी अटक केली.

आगशी पोलिसांनी पीटर वाझ विरोधात गुन्हा नोंद करून त्याच्याकडून .२५ बोर पिस्तूल, झाडलेल्या दोन गोळ्यांचे राऊंड व तीन जिवंत गोळ्या जप्त केल्या. वाझ याला उद्या पोलिस कोठडीसाठी सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे, असे उपनिरीक्षक रमेश हरिजन यांनी दिली.

पोलिस संरक्षणात अंत्यसंस्कार

गोळीबार झाल्यानंतर वेंगुर्लेकर कुटुंबीयांनी पोलिसांना बोलावले. पोलिस आल्यानंतर अंत्यसंस्कार तेथेच करण्यावर ग्रामस्थ ठाम राहिल्याने अखेर जिल्हाधिकारी कार्यालयाला संपर्क साधून परवानगी घेण्यात आली आणि अंत्यसंस्कार करण्यात आले.

आज पहाटे ४.३० वा. सुमारास माझ्या काकाचे निधन झाले. ७.४५ वाजता माझा भाऊ आणि काही मित्र मिळून स्मशानभूमीची साफसफाई करण्यासाठी गेले. पीटर वाझ हा नेहमी काटेरी झाडेझुडपे टाकून स्मशानभूमीचे विद्रुपीकरण करत करतो.

आम्ही पोहोचल्यानंतर वाझ तेथे आला आणि वाद घालण्यास सुरवात केली. नंतर त्याने आपले पिस्तूल काढून दोनवेळा माझ्यावर गोळीबार केला. सुदैवाने मी बचावलो. - श्याम वेंगुर्लेकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT