Goa Casino  Dainik Gomantak
गोवा

Goa Casino: दोना पावला येथील कॅसिनोवर पोलिसांची छापेमारी; 12 जण ताब्यात

Goa Casino गोवा पोलीस दिवाळीसणाच्या निमित्ताने सतर्कतेच्या कारणास्तव अलर्टमोडवर आहेत

Ganeshprasad Gogate

Goa Casino गोवा पोलीस दिवाळीसणाच्या निमित्ताने सतर्कतेच्या कारणास्तव अलर्टमोडवर आहेत. राज्यात चालणाऱ्या गुन्हेगारी स्वरूपाच्या घटनांना आळा घालण्यासाठी, वाढते अपघात रोखण्यासाठी आणि सुरक्षेच्यादृष्टीने पोलीस पथक आपले काम चोख बजावत असल्याचे वारंवार दिसून येतेय.

क्राईम ब्रांच पोलिसांनी मंगळवार रात्री दोना पावला येथे अवैधरित्या चाललेल्या 'चान्सेस कॅसिनो'वर छापा टाकला असून 12 जणांना कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी अटक केल्याची माहिती समोर आलीय.

अशा पद्धतीने चालणाऱ्या कॅसिनोवर छापा मारण्याची ही आठवडाभरातली दुसरी वेळ असून काही दिवसांपूर्वी म्हापसा शेळपे परिसरातील पीटर मिस्किता यांच्या मालकीच्या बंगल्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने चालणारा कॅसिनो जुगार अड्डा स्थानिक पोलिसांनी उद्ध्वस्त केला होता.

तसेच छाप्यावेळी पोलिसांनी मोबाईल फोन व लॅपटॉप वगैरे साहित्यही जप्त करून 9 जणांना अटक केली असून होती.

दोना पावला येथे अटक केलेले हे गोव्यातील रहिवासी होते की अन्य राज्यातील होते याबाबत माहिती मिळूशकली नाही. तसेच पोलिसांना छापेमारी वेळी रक्कम सापडली का याबाबतही माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: '..तर मी स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतणार नाही'! कोहलीच्या विधानाने चाहत्यांना धक्का; तुफानी फटकेबाजीबद्दल म्हणाला की..

CM Pramod Sawant: ‘कशे आसात दोतोर?’ मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी साखळीत गर्दी; आरोग्याची केली विचारपूस

Ponda By Election: फोंड्यात राजकीय ‘पारा’ वाढू लागला! भाजप-काँग्रेस आक्रमक; लैंगिक शोषण प्रकरणाचाही मुद्दा

Indigo Flights: गोव्‍यातून इंडिगोची 6 शहरांची विमानसेवा स्‍थगित! गोमंतकीयांना फटका बसण्‍याची शक्‍यता; 'हे' कारण आले समोर

Ponda By Election: फोंड्यात मुख्यमंत्र्यांसह पाटकर मैदानात! भाजपचा डोळा परप्रांतीय मतांवर; स्मार्ट सिटी बनविण्याची ग्वाही

SCROLL FOR NEXT