Domnic D’Souza Dainik Gomantak
गोवा

Domnic Dsouza : गोव्यात बिलिव्हरपंथी धर्मगुरू डॉम्निक डिसोझा, त्याच्या पत्नीला धार्मिक कृत्ये करण्यास जिल्हाधिकाऱ्यांची बंदी

बेकायदा धर्मांतर केल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी केली होती अटक

गोमन्तक डिजिटल टीम

धर्मांतर केल्याप्रकरणी गुन्हे दाखल असलेल्या सडये- शिवोली येथील डॉम्निक डिसोझा व त्याची पत्नी जोअन मास्कारेन्हास याना त्यांच्या सडये येथील संस्थेच्या इमारतीत धार्मिक कृत्ये करण्यावर बंदी घातली असून त्यासंदर्भातचा आदेश उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आहे.

अजूनही हा वाद अधुनमधून उफाळत असल्याने तेथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न कधीही उपस्थित होऊ शकतो अशी शिफारस पोलिसांनी केली होती. त्याच्या आधारे जिल्हाधिकाऱ्यानी डॉम्निक व जोअन याना सडये शिवोली येथील त्यांच्या संस्थेत त्यांच्या भाविकांसाठी कोणतीही धार्मिक कृत्ये किंवा प्रार्थना आयोजित करण्यास बंदी घालण्याचा आदेश जारी केला आहे.

सडये पंचायत क्षेत्रातील ट्रोपा येथील अवरलेडी ऑफ परसेक्युटेड चर्च परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून बिलिव्हर पंथाच्या डॉम्निक मास्कारेन्हास तसेच गटाकडून प्रार्थना सभांचे आयोजन करण्यात येत आहे. दर रविवारी ट्रॉपा परिसरात प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात येत असलेल्या बिलिव्हर पंथीयांच्या प्रार्थना सभांना हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित रहात असल्याने स्थानिक कॅथोलिक ख्रिस्ती समाज तसेच बिलिव्हर पंथीयांमध्ये अनेकदा खटके उडत होते. यासंदर्भात म्हापसा पोलिसांत अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत.

बिलिव्हर पंथाशी संबंधित खोबरेकर कुटुंबीयांकडून पास्टर डॉम्निक मास्कारन्हेस, त्याची पत्नी जोहान व अन्य लोकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आल्याने पोलिस निरीक्षक परेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पास्टर डिसोझा याला त्याच्या सडये येथील राहत्या घरातून अटक केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Land Dispute Case: जमिनीच्या वादातून खुनाचा प्रयत्न, पोलिसांकडून दोघांना अटक; वाचा नेमकं प्रकरण?

Goa Live Updates: गोव्याला शैक्षणिक हब बनण्यासाठी सरकार काम करतेय: CM प्रमोद सावंत

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

Goa News: डिपॉझिट रिफंड योजनेवरुन 'गोवा कॅन'चा धोक्याचा इशारा! विक्रेते व ग्राहकांमध्ये तंटा होण्याची वर्तवली शक्यता

Mormugao Fort: ऐतिहासिक 'मुरगाव किल्ल्याचे' होणार पुनर्निर्माण! मुख्यमंत्री सावंतांनी गुणवत्तापूर्ण कामाचा दिला विश्वास

SCROLL FOR NEXT