Goa Dog Bites:
Goa Dog Bites: Dainik Gomantak
गोवा

Goa Dog Bites: संध्याकाळी फिरायला गेलेल्या दोना पावला येथील व्यक्तीवर 2 रॉटवेलर कुत्र्यांचा हल्ला; काकरा येथील घटना

Akshay Nirmale

Goa Dog Bites: गोव्यात रॉटवेलर कुत्र्याने हल्ला केल्याची तिसरा घटना नुकतीच समोर आली आहे. दोना पावला येथील एका नागरिकावर दोन रॉटवेलर कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. काकरा येथे गेल्या आठवड्यात हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

दोना पावला येथील एक प्रतिष्ठित नागरिक संध्याकाळच्या वेळी फिरायला बाहेर पडले होते. त्यावेळी दोन पाळीव रॉटवेलर कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. हे दोन्ही कुत्रे गोवा लोकसेवा आयोगाच्या माजी अध्यक्षांच्या मालकीचे आहेत.

या प्रकारानंतर संबंधित जखमी नागरिकाने थेट पोलिसांत तक्रार दाखल केली. या नागरीकाच्या हाताला कुत्र्याने चावा घेतल्याने त्यााल 24 इंजेक्शन्स देण्यात आली असून तो अद्याप दुखापतीतून पूर्णपणे बरा झालेला नाही.

२६ डिसेंबर रोजी सायंकाळी ही घटना घडली. जेव्हा संबंधित नागरिक आपल्या पाळीव कुत्र्यासोबत काक्रा गावातील समुद्रदर्शन कॉलनीजवळ संध्याकाळी फिरायला गेला होता.

त्यांनी सांगितले की, मी चालत असताना अचानक मोकळे सोडलेल्या दोन रॉटवेलर्सनी कुत्र्यांनी माझ्या कुत्र्यावर हल्ला केला. माझ्या कुत्र्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना, रॉटवेलर्सनी माझ्या हातालाही चावा घेतला, त्यामुळे मोठी दुखापत झाली.

कुत्र्यांना असे मोकळे सोडणे आणि इतरांना धोका निर्माण करणे हा मालकाचा निष्काळजीपणा आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, या आधी कामुर्ली येथील एका 10 वर्षाच्या मुलाला केअरटेकरच्या निष्काळजीपणामुळे रॉटवेलर कुत्र्याने चावा घेतला होता. मुलाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

तत्पूर्वी, गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये ताळगाव येथे रॉटवेलरच्या हल्ल्यात दोन लहान भावंडे गंभीर जखमी झाली होती. या कुत्र्याच्या मालकावरही नंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tourist Rush At Morjim Beach: मोरजी समुद्रकिनाऱ्यावर तोबा गर्दी; पर्यटकांसह स्थानिकांचीही वळली पावले

Monsoon Health Care: आला पावसाळा, काळजी घ्या, आरोग्य सांभाळा! मलेरिया डेंग्यूबाबत जागृती आवश्‍यक

Tiswadi News : तिसवाडीत मध्यरात्री दीड तास बत्तीगुल; ११० केव्ही केबल तुटली

Goa Cyber Crime: नोकरीच्या बहाण्याने विनयभंग; संशयिताला बंगळुरूमध्ये अटक

Goa Money Laundering Case: वेश्या व्यवसायातील 21 कोटी हवालाद्वारे परदेशात; मनी लॉंड्रिंग प्रकरणाचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT