Tiger  Dainik Gomantak
गोवा

लोकांनी व्याघ्र प्रकल्पाचा विचार सोडून द्यावा: वनमंत्री विश्‍वजीत राणे

आम्ही व्याघ्र प्रकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी लढा देऊ: क्लॉड अल्वारिस

दैनिक गोमन्तक

पणजी: गोवा भौगोलिकदृष्ट्या खूप लहान आहे. त्यामुळे व्याघ्र प्रकल्पासारखे मोठे प्रकल्प शक्य नसल्याने आणि देशात अस्तित्वात असलेल्या व्याघ्र प्रकल्पांमध्येही समस्या असल्याने राज्याला व्याघ्र प्रकल्पाची आवश्‍यकता नाही. तसा कोणताही प्रस्ताव वन विभागाकडे आलेला नाही. त्यामुळे व्याघ्र प्रकल्पाचा विचार सोडून द्यावा, असा पुनरूच्चार वनमंत्री विश्‍वजीत राणे यांनी शुक्रवारी केला. (Goa does not need a tiger reserve says Vishwajit Rane)

यासंदर्भात गुरुवारी मंत्री राणे यांनी गोव्याला व्याघ्र प्रकल्पाची गरज नाही, असे सांगितल्यावर राज्यासह देशभरातल्या पर्यावरणप्रेमींनी त्यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका करत राणे यांच्यासारख्या मंत्र्यांनी संविधानात्मक पद सोडून द्यावे. तसेच मानवी भौगोलिक सीमा या वन्य प्राण्यांना समजू शकत नाहीत. त्यामुळे गोव्यात वाघ नाहीत, असे मंत्र्यांनी म्हणणे चुकीचे आहे, असाही सूर उमटला होता.

शनिवारी राणे म्हणाले, मी पर्यावरणप्रेमी असून गेली 20 वर्षे देशभरातल्या विविध अभयारण्यांमधून फिरत आहे. वाघ माझा आवडता प्राणी आहे. माझा जंगल व्यवस्थापनाचा अभ्यास आहे. व्याघ्र प्रकल्पासाठी मोठ्या कोअर आणि बफर झोनची आवश्‍यकता असते. काही वेळेला ज्या ठिकाणी असे प्रकल्प झाले आहेत, तेथेही काही समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे गोव्याला व्याघ्र प्रकल्पाची गरज नाही. मात्र, अस्तित्वात असलेले अभयारण्य आणि नॅशनल पार्कच्या साहाय्याने सर्व प्राण्यांचे संरक्षण करणार आहोत, असे राणे म्हणाले.

रोडमॅप बनवणार

तथाकथित पर्यावरणप्रेमींनी आम्हाला कायदे सांगू नयेत. अशा बिगर शासकीय संस्थांची आम्हाला गरज नाही. राज्यात वनविभागाचा कुशल कर्मचारीवर्ग आहे. त्याशिवाय काही निवृत्त अधिकारीही आहेत. याशिवाय राष्ट्रीय वन्यजीव संस्था, राष्ट्रीय जंगल व्यवस्थापन संस्था यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याच्या वनविभागाचा रोडमॅप बनवत आहोत.

वाघाला कळत नाही की तो कर्नाटकचा आहे की गोव्याचा. त्याची प्रजाती कुठलीही असली तरी ती संरक्षणास पात्र आहे. मला असे वाटते की, वनमंत्र्यांनी टिप्पणी करण्यापूर्वी किमान या प्रकरणाचा अभ्यास करायला हवा. आम्ही व्याघ्र प्रकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी लढा देऊ.

- क्लॉड अल्वारिस, पर्यावरणप्रेमी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT