Doctor of IMA Goa Department talking to reporters at Porvarim Police Station (Goa Doctor March)
Doctor of IMA Goa Department talking to reporters at Porvarim Police Station (Goa Doctor March) Dainik Gomantak
गोवा

Goa Doctor March: डॉक्टर तिळवे मारहाण प्रकरणी आयएमए गोवा विभागाचा मोर्चा

Datta Shirodkar

Goa Doctor March: पर्वरी येथील जे एम जे हॉस्पिटलमध्ये (JMJ Hospital Porvorim) सेवा देणारे डॉक्टर डॉ.अमोल तिळवे यांना मारहाण करणाऱ्या (Doctor assault case JMJ Hospital) संशयित मिनेश नार्वेकर (पीडीए कॉलनी- पर्वरी ) याला पर्वरी पोलीस स्थानकात तक्रार दाखल करून दोन दिवस उलटूनही अटक न केल्याकेल्यामुळे डॉक्टरांनी आज पोलीस स्थानकावर मोर्चा (IMA Goa March) नेवून पोलीस उपअधीक्षक एडविन कुलासो आणि निरीक्षक निनाद देऊळकर यांना जाब विचारला व संशयित नार्वेकर आणि त्याच्या सात साथीदारांना त्वरित अटक करण्याची मागणी केली आहे. तसेच जर पोलिसांनी संशयिताना बुधवार दि.1 सप्टेंबर पर्यंत अटक केली नाही तर पुढे घडणाऱ्या घटनांना पोलीस जबाबदार असणार आहे. असा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशनचे (IMA) अध्यक्ष डॉ.विनायक बुवाजी यांनी दिला आहे.यावेळी त्यांच्या समवेत डॉ.शैलेश कामत,डॉ.संदीप नाईक,डॉ.गोविंद कुमार,डॉ.अजित मोपकार,डॉ.शाम लवंदे आणि डॉ.शेखर साळकर होते.यावेळी सुमारे दोनशेहून अधिक डॉक्टर उपस्थित होते. डॉ.अमोल तिळवे मारहाण प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेऊन संशयित मिनेश नार्वेकर आणि त्यांच्या साथीदारांवर त्वरित गुन्हा दाखल केला व संशयिताना त्वरित अटक केले जाईल असे आश्वासन पोलीस उपाधीक्षक एडविन कुलासो यांनी दिले आहे.

अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत राहिल्या तर आम्ही रस्त्यावर येऊन मोर्चा काढणार नाही पण निश्चित संप पुकारून राज्यातील सर्व वैद्यकीय सेवा कोलमडून टाकणार आहे. त्यासाठी पोलिसांनी त्वरित संशयिताला अटक करावे व आमच्यावर बेमुदत संप करण्याची पाळी आणू नये. त्यामुळे सामान्य माणूस भरडला जाईल.असा इशारा शैलेश कामत यांनी दिला. संशयितांनी डॉ. तिळवेवर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित पद्धतीने केला आहे. तसेच या बालक मृत्यू प्रकरणी डॉ. तिळवे यांना जबाबदार ठरविणे हे चुकीचे आहे.कारण या बालकाला जन्मताच दोष असल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. अशा प्रकारचा दोष क्वचित निर्माण होतात. मेडिकलच्या अद्यावत उपकरणाने सुद्धा अशा प्रकारच्या दोषांचे निदान होत नाही. त्यासाठी डॉ. तिळवे यांनीं सर्वस्वी जबाबदार ठरवून मारहाण करणे चुकीचे आहे. जर कुटुंबियांना न्याय हवा होता तर त्यांनी मेडिकल कौन्सिल किंवा अन्य ठिकाणी न्याय मागायला हवा होता, असे डॉ. गोविंद कामात यांनी सांगितले.

डॉ.तिळवे यांची काहीच चूक नसताना त्याला मारहाण केले हे चुकीचे आहे. तसेच न्यायालयाने संशयिताना जामिनावर सोडू नये कारण जर संशयिताला जामिनावर सोडले तर समाजात चुकीचे पायंडा पडेल. संशयिताला त्वरित अटक होवून शिक्षा जालीच पाहिजे. त्यामुळे पुढे अशा प्रकारचे डॉक्टरवर हात उचलण्याचे धाडस करणार नाही. त्याला जर न्याय हवा होता तर तो न्यायालय, तक्रार कक्ष दाद मागू शकतो.असे डॉ.शेखर सालकर यांनी सांगितले

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkan Railway Fine Collection: फुकट्यांना कोकण रेल्वेचा दणका, एप्रिलमध्ये 2.70 कोटी दंड वसूल

Goa Crime: रस्ता अडविणे, दंगल माजविणे याप्रकरणी कुंकळ्ळीत 400 भाविकांविरोधात गुन्हा

Defamatory Post Lairai Devi: अन्यथा अस्नोडा जंक्शन रोखणार! भाविकांची म्हापसा पोलिस स्थानकावर धडक

Madgaon Station News: कोकण रेल्वेची मडगाव येथे रेंट अ बाईक सुविधा; विजय सरदेसाईंचा कडाडून विरोध, आंदोलनाचा इशारा

आम्ही गप्प बसू शकत नाही...अल्पवयीन मुलीच्या गर्भपातास कोर्टाची परवानगी

SCROLL FOR NEXT