Goa Diwali Festival Dainik Gomantak
गोवा

Goa Diwali Festival: बांदोड्यात शनिवारी 'दीपोत्सव 2022' कार्यक्रमाचे आयोजन!

Goa Diwali Festival: बांदोडा ग्रामपंचायत आणि माधवराव ढवळीकर ट्रस्ट यांच्यातर्फे यंदाचा 'दीपोत्सव 2022' हा कार्यक्रम साजरा करण्यात येणार आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Diwali Festival: बांदोडा ग्रामपंचायत व माधवराव ढवळीकर ट्रस्ट यांच्यातर्फे यंदाचा ‘दीपोत्सव 2022‘ हा परंपरा जपण्याचा व सांगितिक मैफल सजवण्याचा अनोखा कार्यक्रम येत्या शनिवारी 29 रोजी विविध कार्यक्रमांनिशी साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवात पारंपरिकतेचे दर्शन घडवण्याबरोबरच विविध पोह्यांच्या पदार्थांचा आस्वादही उपस्थितांना घेता येणार आहे.

दरम्यान, यासंबंधीची माहिती काल (मंगळवारी) बांदोडा येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत माधवराव ढवळीकर ट्रस्टचे विश्‍वस्त मिथिल ढवळीकर यांनी दिली. यावेळी जिल्हा पंचायत सदस्य गणपत नाईक, बांदोडा सरपंच सुखानंद कुर्पासकर, उपसरपंच चित्रा फडते, पंचसदस्य वामन नाईक, मुक्ता नाईक व माजी पंच मशाल आडपईकर आदी उपस्थित होते.

बांदोडा येथील भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर हा कार्यक्रम शनिवारी संध्याकाळी साडेपाच वाजता सुरू होणार आहे. त्यात श्रीकृष्ण पूजन, लक्ष्मी पूजन तसेच पाडवा व धेंडलोत्सव होणार आहे. या कार्यक्रमात दिवाळीच्या फराळातील सर्व पोह्यांच्या पदार्थांचा आस्वाद उपस्थितांना घेता येणार आहे.

संध्याकाळी सात वाजता 'दीप सप्तस्वर'' हा कार्यक्रम सादर केला जाईल. त्यात गायक कलाकार अमोल बावडेकर यांच्यासह अबोली गिर्हे, गणेश मेस्त्री व नम्रता पराडकर भाग घेणार आहेत. त्यानंतर भरतनाट्यम नृत्याचा कार्यक्रम नृत्यांगना निशिका नागेशकर व सी. व्ही. रोशनी या कलाकार सादर करणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao: 6 महिन्यांमध्ये 10 कोटींचे लक्ष्य! मडगाव पालिकेने कसली कंबर; 35 कोटी थकबाकी वसुलीचे उद्दिष्ट्य

Priol: प्रियोळात सत्तेसाठी चढाओढ सुरू! माशेल, खांडोळा, भोम पंचायतीत अस्थिरता; ग्रामस्थांत नाराजीचा सूर

Goa Cruise Tourism: क्रूझवरुन गोव्यात 67,594 प्रवासी, 9 महिन्यांत कमावलं 4.82 कोटींचं उत्पन्न; मुरगाव बंदर बनलं क्रूझ पर्यटनाचं केंद्र

Lok Sabha in Konkani: वाल्लोर! लोकसभेचं कामकाज कोकणीत होणार; इतिहासात पहिल्यांदाच संसदेत 'गोव्याचा' आवाज दुमदुमणार

Ganesh Chaturthi: 'दीपवती' नावाने ओळखले जाणारे, गोव्यातील सर्वांत मोठे गणेश मंदिर; 16 व्या शतकाच्या पूर्वार्धात स्थलांतरीत झाले..

SCROLL FOR NEXT