Goa Diwali 2022 Dainik Gomantak
गोवा

Goa Diwali 2022: राज्यभरात दीपावलीच्या तेजाळल्या दाही दिशा!

Goa Diwali 2022: गेली दोन वर्षे कोरोनामुळे मोठ्या उत्साहात साजरी न करता आलेली दिवाळी यंदा मात्र सर्वत्र धुमधडाक्यात साजरी होत आहे.

दैनिक गोमन्तक

Diwali Festival 2022: गेली दोन वर्षे कोरोनामुळे मोठ्या उत्साहात साजरी न करता आलेली दिवाळी यंदा मात्र सर्वत्र धुमधडाक्यात साजरी होत आहे. यासाठी राज्यातील बाजारपेठा भरून गेल्या असून दागिने, वाहने, इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे याबरोबर नानाविध प्रकारच्या खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाल्याचे दिसून आले. पहाटेच्या नरकासुर दहन आणि दीपोत्सवाने नव्या प्रकाशपर्वाची सुरवात झाली आहे.

रविवारी आयती सुटी चालून आल्याने लक्ष्मीपुजनासाठीची खरेदी केली. त्यात पणत्या, आकाशकंदिल, विद्युत रोषणाईचे साहित्याची मोठी विक्री झाली. या दिवाळीत व्यापाऱ्यांची ही चांदी झाली. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक दुकानदारांनी विविध ऑफर्स जाहिर केल्या होत्या. परिणामी नागरिकांनी दोन वर्षांनतर हात न आखडता भरघोस खरेदी केली.

दिवाळीचा अर्थकारणावर सकारात्मक परिणाम होत असून कररुपाने राज्य सरकारच्या तिजोरीत पैसा जमा होत आहे. सुट्यानिमित्त देशभरातील हजारो पर्यटक गोव्यात दाखल होत आहेत. त्याकरिता अनेक हॉटेल्सच्या बुकिंग फुल्ल होत आहेत.

दरम्यान, गत काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत घसरण होत असताना आज किरकोळ वाढ झाली. ‘गुडरिटर्न’ वेबसाइटच्या माहितीनुसार, 24 कॅरेटमध्ये 10 रुपयांची वाढ होऊन दर प्रतितोळा 51,290 रुपयांवर पोहोचला आहे. तसेच 22 कॅरेट सोन्याचा दर 47,010 रुपये झाला आहे.

बाजारपेठांमध्ये गर्दी; आर्थिक उलाढाल वाढली

दिवाळीनिमित्त वाहनांच्या विक्रीला देखील वेग आल्याचे पाहायला मिळाले. दुचाकी वाहनांची खरेदी गतवर्षीपेक्षा 17 टक्के जास्त झाल्याची माहिती असून चारचाकी वाहनांची खरेदी वाढल्याचे वाहतून खात्याकडून सांगण्यात आले. अधिकृत आकडेवारी अद्याप आली नाही. तर दुसरीकडे, नागरिकांनी ऑनलाईनसोबत प्रत्यक्षात दुकानात जाऊन वस्तू खरेदी करण्यावर भर दिला.

विविध ठिकाणी नरकासुर दहन

अनेक दशकांपासून मोठ्या उत्साहात सुरू असलेली नरकासुर दहनाची प्रथा यंदा जल्लोषात पार पडली. शहरे आणि गावागावातील चौकाचौकात उभारलेल्या आक्राळविक्राळ नरकासुराच्या पुतळ्याचे पहाटे दहन करण्यात आले. या नरकासुरांना पाहण्यासाठी संध्याकाळी 6 नंतर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे अनेक शहरातील रस्ते वाहनांनी फुलून गेले होते.

मुख्यमंत्री, राज्यपाल यांच्याकडून शुभेच्छा

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी राज्यातील सर्व नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहे. दिवाळी सण अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा, निराशेवर आशेचा विजयोत्सव असतो. जनतेला सुख, समृद्धी लाभो, अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी केली.

पावसाची उघडीप: कमी दाबाच्या पट्ट्यामुळे सुरू असलेल्या मुसळधार पावसाने आज उघडीप घेतली. त्यामुळे नरकासुर दहन आणि दीपावली पहाट व्यवस्थित साजरी करता आली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील चार दिवस मोठ्या पावसाची शक्यता नाही. मात्र, काही भागात तुरळक सरी बरसतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Labour Report: गोव्यात रोजंदारीवरील कामगारांच्या संख्येत मोठी घट! 10 वर्षांत 40 हजार कामगार कमी झाले; कारखाने आणि बाष्पक खात्याच्या नोंदीतून उघड

New Labour Law: कामगारांना समान वेतन, डिजिटल पेमेंट! केंद्र सरकारच्या नव्या कायद्यांची गोव्यात अंमलबजावणी होणार; मुख्यमंत्री सावंतांची घोषणा

Goa ZP Election: युती झाली, पण जागावाटप थांबले! झेडपी निवडणुकीत 'काँग्रेस-फॉरवर्ड-आरजीपी' एकत्र; आरक्षणाच्या निवाड्याकडे तिन्ही पक्षांचे लक्ष

South Goa ZP Reservation: ओबीसी 'ट्रिपल टेस्ट' आणि एससी आरक्षणाचा पेच! झेडपी निवडणुकीच्या भवितव्याचा निर्णय आता न्यायालयाच्या हाती

Mhadei Sanctuary Issue: सीमा ठरवणार, वस्ती हलवणार? म्हादई अभयारण्यात वस्तीला परवानगी नाही, व्याघ्र प्रकल्पाचा पर्याय हुकल्याने गोंधळ; क्लॉड आल्वारिस यांनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT