Goa ZP Election Dainik Gomantak
गोवा

Goa ZP Election: जिल्‍हा पंचायतीसाठी रेईश-मागूसमध्ये 43.94 टक्के मतदान

Goa ZP Election: मतदानाची टक्केवारी पाहिल्यास सत्ताधारी पक्षासाठी हे जमेची बाजू मानली जात आहे.

दैनिक गोमन्तक

Goa ZP Election: अवघ्‍या सहा महिन्यांतच रेईश-मागूस जिल्‍हा पंचायतीसाठी पोटनिवडणूक झाल्‍याने मतदानाला मतदारांचा अल्प प्रतिसाद लाभला. सायंकाळी पाच वाजेपर्यंत या मतदारसंघात फक्त 43.94 टक्केच मतदान झाले. एकूण 18,467 मतदारांपैकी फक्त 8114 जणांनीच मतदान केले. यामध्ये 4280 पुरुष व 3834 महिला मतदारांचा सहभाग होता. एकंदरीत शांततेत व सुव्यवस्थितपणे मतदान पार पडले.

दरम्यान, या मतदारसंघात चार उमेदवार रिंगणात आहेत. त्‍यात भाजपचे संदीप बांदोडकर, काँग्रेसच्‍या प्रगती पेडणेकर, ‘आरजी’चे साईनाथ कोरगावकर व अपक्ष उमेदवार राजेश दाभोळकर यांचा समावेश आहे. मतदानाची टक्केवारी पाहिल्यास सत्ताधारी पक्षासाठी हे जमेची बाजू मानली जात आहे.

तत्कालीन झेडपी सदस्य रुपेश नाईक यांच्या राजीनाम्यानंतर बार्देश तालुक्यातील रेईश-मागूस जिल्हा पंचायत मतदारसंघाची ही पोटनिवडणूक झाली. दरम्‍यान, भाजपबरोबरच काँग्रेस व ‘आरजी’नेही आपापल्या विजयाचा दावा केला आहे.

मतदानापेक्षा खेळ, मळणीला प्राधान्‍य

एकीकडे जिल्‍हा पंचायत पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू होते, दुसरीकडे शेतकरी शेतात तर युवक मैदानावर खेळताना दिसत होते. मतदारसंघात 26 मतदान केंद्रे होती. मतदान केंद्रांबाहेर गर्दी नसल्याने लोकांना ताटकळत थांबावे लागत नव्हते. एरवी लोकांची गर्दी दिसायची. आज रविवारी सुट्टीाच दिवस असल्याने युवकांनी मतदान करण्यापेक्षा मैदानावर क्रिकेट (Cricket) खेळण्‍याचा आनंद लुटला.

केदार नाईक, आमदार-

मतदारांचा प्रतिसाद खूपच कमी होता. पोटनिवडणुकीमुळे कदाचित लोक घराबाहेर पडले नसावेत. गेल्या वेळी 52 टक्के मतदान झाले होते. पावसाचाही मतदानावर परिणाम झाला. आमचा विजय निश्‍चित आहे.

संदीप बांदोडकर, भाजप उमेदवार-

ही निवडणूक एकतर्फी होणार असून, माझा विजय नक्की आहे. जे मतदार घराबाहेर पडले, ते सर्व आमचेच होते. मतदान कमी झाले असल्‍यामुळे विरोधकांना विजयाची संधी मुळीच नाही.

राजेश दाभोळकर, अपक्ष उमेदवार-

मतदानाची टक्केवारी पाहिल्यास मतदारांचा निवडणूक (Election) प्रक्रियेवरील विश्वास कमी झाला आहे, असेच म्हणावे लागेल. माझ्यासोबत माझे मतदार असून विजय निश्‍चित आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Borim Accident: बोरी येथे भीषण अपघात! काँक्रिटवाहू ट्रकची कारला जोरदार धडक, 4 मुलांसह 6 जण गंभीर जखमी

Goa Assembly Speaker: गोवा विधानसभेला मिळणार नवा अध्यक्ष, राज्यपालांनी बोलावले विशेष अधिवेशन; रमेश तवडकरांनंतर कोणाची लागणार वर्णी?

Chandragrahan 2025: धनलाभ की नुकसान? भाद्रपद पौर्णिमेचे चंद्रग्रहण 'या' राशींसाठी ठरू शकते अशुभ; 12 राशींवर काय होईल परिणाम?

Viral Video: विशाल देह पण कोमल मन...! हत्तीणीचा इमोशनल व्हिडिओ व्हायरल, माणसावरील प्रेम पाहून यूजर्संना अश्रू अनावर

Bambolim Cancer Centre: ''बांबोळीचे कॅन्सर सेंटर निवडणुकीच्या आधी तयार होणार'' आरोग्यमंत्र्यांचा दावा!

SCROLL FOR NEXT