Distribution of fruit saplings, Agarwada, Goa. on 27 July, 2021. Nivrutti Shirodkar / Dainik Gomantak
गोवा

Goa: आगरवाडा गणेशोत्सव मंडळ व रोटरी क्लब तर्फे फळ रोपट्याचे वाटप

अध्यापक विठोबा बगळी यांचे पर्यावरणविषयक मार्गदर्शन (Goa)

Siddhesh Shirsat

मोरजी: गणेश ही निसर्ग देवता आहे. निसर्गाचे रक्षण म्हणजे श्री गणेशाचे पूजन. झाडे लावा, झाडे जगवा. हा संदेश आजच्या कार्यक्रमातून देताना आपण निसर्गाचे रक्षण करूया असे प्रतिपादन कोरगावच्या श्री कमलेश्वर उच्च माध्यमिक विद्यालयाचे अध्यापक (Teacher) विठोबा बगळी यांनी केले. आगरवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (Agarwada Ganeshotsav Mandal) आणि रोटरी क्लब पेडणे तर्फे वनखात्याच्या सहकार्याने आयोजित केलेल्या विविध फळ झाडांची रोपटी वाटप करण्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आगरवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष संतोष चोडणकर, सचिव सखाराम नागवेकर, खजिनदार सुदन नाईक, आगरवाडा चोपडेचे माजी सरपंच बाबली राऊत, रोटरी क्लब पेडणेचे जयानंद गावकर आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्री बगळी पुढे म्हणाले, श्री गणेश ही निसर्गाची देवता आहे. गणेश पूजनाच्या वेळी बांधणाऱ्या माटोळीला आपण निसर्गातील विविध वस्तू बांधतो त्याच्या पूजेला शमी, दुर्वा, जास्वंद तसेच अन्य गोष्टींची आवश्यकता असते. आणि या सर्व बाबींची पूर्तता निसर्ग करतो. अगदी आपली गणेश मूर्ती सुध्दा मातीपासून तयार होते, मातीतच विलीन होते. त्यासाठी आपण या निसर्गाचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी झाडे लावायला हवीत. झाडे जगवायला हवीत. तरच आपण जगू, असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT