मोरजी: कोरोना काळात (Corona Time) ऑक्सिजन मिळवण्यासाठी मोठी धावपळ करावी लागली होती(Lack of Oxygen). आता मोठ्या संख्येने झाडे लावूया निसर्गाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावून निसर्गाची पुजा करुया (Tree planting), असे आवाहन मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे (MLA Dayanand Sopate) यांनी तुये पंचायत परिसरात कृषी खात्यांतर्गत (Agriculture Department) मोफत झाडे वितरीत केल्यानंतर बोलत होते. ४ रोजी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला सरपंच सुहास नाईक, माजी सरपंच प्राजक्ता कान्नाईक, जयराम नाईक, पंच कविता तुयेकर आदी उपस्थित होते. (Goa)
यावेळी आमदार दयानंद सोपटे यांनी बोलताना झाडांची निगा आपल्या मुलाप्रमाणे राखावी, निसर्ग आम्हाला सर्व प्रकारचे संरक्षण देतो, त्याचा सांभाळ करुया असे सांगून दीड ते दोन हजार झाडे तुये गावात लागली असणार. पूर्ण मतदार संघात किमान आठ हजार झाडे लावण्यात आली, असे सांगितले. सरपंच सुहास नाईक यांनी बोलताना जी झाडे तुम्ही नेली आहात ती व्यवस्थित लावून त्याची निगा राखावी, त्यांचे संरक्षण करावे व त्यापासून उत्पन्न घ्यावे असे आवाहन केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.