पेडणे मतदारसंघातील शेतकाऱ्यासोबत उपमुख्यमंत्री बाबू अजगावकर (Goa)  दैनिक गोमन्तक
गोवा

Goa: "पेडणे राज्यातील आदर्श मतदारसंघ घडविण्यासाठी सहकार्य करा "

मोपा विमानतळाच्या माती घुसल्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धनादेश वितरित केले (Goa)

प्रकाश तळवणेकर

Goa: पेडणे मतदारसंघ (Pernem Constituency) राज्यातील एक क्रमांकाचा मतदारसंघ बनवुया. त्यासाठी सर्वानी सहकार्य करावे  असे आवाहन उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर (Deputy CM Babu Ajgaonkar) यांनी येथे बोलताना केले.जुन महिन्यात बांधकाम सुरु असलेल्या मोपा विमानतळाची माती शेती व बागायतीत घुसुन नुकसानी झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे धनादेश वितरीत (Cheques issued) कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी  अमेरे पोरस्कडे व उगवे येथील १२० शेतकऱ्यांना एकूण १६ लाख रूपयांची नुकसानभरपाई देण्यात आली.याप्रसंगी .व्यासपीठावर जि प सदस्य मनोहर धारगळकर, नगराध्यक्ष उषा नागवेकर, चांदेल हसापुरचे सरपंच संतोष मळिक ,उगवेचे माजी सरपंच शशिकांत महाले हे उपस्थित होते.

पुढे बोलताना उप मुख्यमंत्री बाबू आजगावकर प म्हणाले कि, पुर्वी धारगळ मतदारसंघात कसल्याही मूलभूत सोइसुविधा नव्हत्या. मी धारगळ मतदारसंघातुन निवडून आल्यावर पाणी, रस्ते अशा अनेक सोइसुविधा उपलब्ध करुन तर दिल्याच पण या व्यती रिक्त वाड्यावाड्यावर गाव जोडण्यासाठी नवीन रस्ते व पूल बांधीतले. सगळ्यानाच नोकऱ्या मिळणे शक्य नसले तरी शक्य तितक्या नोकऱ्या मिळवून दिल्या. रोजगारी ही मुख्य समस्या असून मोपा विमानतळ, आयुष इस्पितळ, क्रिकेट स्टेडियम अशा प्रकल्पातून येत्या काळात अनेक नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. मोपा विमानतळ आम्ही खेचून आणला आहे. त्यासाठी आमच्या शेतकऱ्यांनी आपल्या जमीनी दिल्या आहेत.म्हणून जमीनी दिलेल्यानाप्रथम,नंतर या भागातील स्थानीक, तालुक्यातील अशांना नोकऱ्यांत प्राधान्यअसेल. पण त्यासाठी जागृत रहाण्यासाठी माझी आवश्यकता आहे. संतोष मळिक यांनी सूत्रसंचालन करून अभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Super Cup: सुपर कपचा बिगुल! 25 ऑक्टोबरपासून रंगणार थरार; FC Goa समोर विजेतेपद राखण्याचे खडतर आव्हान

Goa Taxi: 'टॅक्‍सी ॲग्रीगेटर जबरदस्तीने लादणार नाही'! गुदिन्‍होंची हमी; सरकारकडे सुमारे 3500 सूचना, हरकती

Panaji: ‘बोर्डवॉक’ची पणजी महानगरपालिका दुरुस्ती करणार? 2 वर्षांपासून दुर्दशा; धोका असूनही नागरिकांचा वावर

Chandel Hasapur: सरपंचालाच मिळाली सरकारी नोकरी, पदासह दिला पंच सदस्यत्वाचा राजीनामा; चांदेल हसापूरमध्ये रंगणार रस्सीखेच

Goa ITI: ‘आयटीआय’ करणाऱ्यांसाठी खूशखबर! 2 वर्षांच्‍या कोर्सनंतर मिळणार दहावी, बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र; मुख्‍यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT