Goa discontinues Promotion of electric vehicle  Dainik Gomantak
गोवा

गोवा सरकारचा मोठा निर्णय! ईलेक्ट्रिक वाहन प्रोत्साहन योजना 31 जुलैपासून बंद होणार

एक ऑगस्टपासून खरेदी होणाऱ्या वाहनांवर सबसिडी मिळणार नाही

गोमन्तक डिजिटल टीम

गोवा सरकारच्या उर्जा विभागाने आज (दि.25) मोठा निर्णय घेतला असून, 31 जुलैपासून ईलेक्ट्रिक वाहन प्रोत्साहन योजना (Promotion of electric vehicle) बंद होणार आहे. त्यामुळे एक ऑगस्टपासून खरेदी होणाऱ्या वाहनांवर सबसिडी (Subsidy) मिळणार नाही. या निर्णयाचा ईलेक्ट्रिक वाहन खरेदीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. (Goa discontinues Promotion of electric vehicle scheme)

नव आणि अक्षय उर्जा विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार, 31 जुलै 2022 पासून राज्यात ईलेक्ट्रिक वाहन प्रोत्साहन योजना बंद केली जाईल. डिसेंबर 2021 ते 31 जुलै 2022 या कालावधीत खरेदी केलेल्या ईलेक्ट्रिक वाहनांवर सबसिडी मिळणार आहे. त्यानंतर खरेदी केलेल्या वाहनांवर सबसिडी लागू होणार नाही. दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनांसीठी हा नियम लागू आहे. म्हणजेच एक ऑगस्टपासून खरेदी केलेल्या ईलेक्ट्रिक वाहनांवर सबसिडी मिळणार नाही.

केंद्रिय सरकार ईलेक्ट्रिक वाहन खरेदी आणि वापरासाठी प्रोत्साहन देत आहे. त्यानुसार अनेक वाहन कंपन्या देखील मार्केटमध्ये आल्या आहेत. राज्य सरकारकडून मिळणारी सबसिडी यामुळे नागरिक ईलेक्ट्रिक वाहन खरेदीचा निर्णय घेत आहेत. दरम्यान, गोवा सरकारच्या या निर्णयामुळे येत्या काळात ईलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवर कसा परिणाम होतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT