Director General Of Police Jaspal singh  Dainik Gomantak
गोवा

Goa Police : समाजकंटकांकडून दिशाभूल ; जनतेने सावध रहावे : जसपाल सिंग

तर हे समाजविरोधी घटक त्यांच्या मनसुब्यांमध्ये यशस्वी होतील. त्‍यांना तेच हवे असते.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Police: पणजी, : समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याच्‍या हेतूने काही समाजकंटक प्रसारमाध्यमांचा वापर करत आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा मजकुरांची दखल पोलिस खात्यामार्फत दैनंदिन घेतली जात आहे.

या प्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांचा तपास सुरू आहे. त्यामुळे जनतेने अशा दिशाभूल करणाऱ्या मजकुरांना बळी पडू नये. गैरप्रकार व दिशाभूल करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांनी दिला आहे.

लोकांनी अशा प्रकारांना बळी पडून त्यास पाठिंबा देण्यासाठी दुसरी पोस्ट टाकली किंवा आंदोलन केले तर हे समाजविरोधी घटक त्यांच्या मनसुब्यांमध्ये यशस्वी होतील. त्‍यांना तेच हवे असते.

अशा समाजकंटकांना जेरबंद करण्यासाठी लोकांनी पोलिसांना सहकार्य करावे. अशा प्रकरणाचा तपास हा अत्यंत गुप्‍त व तांत्रिक पद्धतीने केला जातो. त्यास अनेकदा वेळही लागतो, असेही जसपाल सिंग सांगितले.

समाजात धार्मिक तेढ निर्माण झाल्यानंतर काही समाजकंटक त्यास खतपाणी घालण्यासाठी जुन्या पोस्टचा वापर करत असल्याचे समोर आले आहे.

अशा जुन्या पोस्टद्वारे जनतेच्या भावना भडकावल्या जात आहेत. त्‍यापासून जनतेने सावध रहावे. अशा पोस्टवर प्रतिक्रिया देण्यापेक्षा अशा घटनांची तक्रार पोलिसांकडे करावी.

- जसपाल सिंग, पोलिस महासंचालक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

Goa Assembly Session: गोवा विधानसभेचा 'खेळखंडोबा'! सत्ताधारी-विरोधकांच्या राजकारणात राज्याच्या भवितव्याचा विसर

Dabolim Dubai Flight: दाबोळी-दुबई विमानसेवा पुन्हा सुरू होणार, दररोज एक उड्डाण; मुंबई-गोवा मार्गावरही दिवसाला 8 फेऱ्या

Goa Tourist Death: आठ महिन्यांत गोव्यात 56 पर्यटकांचा मृत्यू! 4 पर्यटकांचे खून; 14 जणांचा बुडून मृत्यू, तर 10 जणांची आत्महत्या

SCROLL FOR NEXT