Goa News | Road Safety Dainik Gomantak
गोवा

Goa News: धारबांदोड्यात विद्यार्थ्यांना 'रस्ता सुरक्षा'वर मार्गदर्शन

Goa News: विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

दैनिक गोमन्तक

Goa News: धारबांदोडा येथील गोवा मल्टिफॅकल्टी महाविद्यालयाचा एनएसएस विभाग आणि धारबांदोडा तालुका वाहतूक संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रस्ता सुरक्षा’विषयावर विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

रस्ता सुरक्षा आणि सुरक्षित वाहन चालविणे याबाबतच्‍या या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना उपयुक्त अशी माहिती साहायक वाहतूक संचालक संतोष गावडे आणि वाहतूक निरीक्षक संकल्प नावती यांनी दिली. या मान्यवरांनी विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.

रस्ता (Road) सुरक्षा उपायांची माहिती यावेळी देण्यात आली. अपघात कसे टाळले जाऊ शकतात, वाहन चालविताना आणि वाहनावर असताना कसे सजग रहावे, याबाबत त्यांनी सूचना केल्या. संस्थेचे प्राचार्य शेख मोहम्‍मद परवेझ अल-उस्मानी यांनी आपल्या स्वागतपर भाषणात विद्यार्थ्यांनी वाहन चालविताना आणि वाहनावर बसल्यानंतर जबाबदारीने वागावे असे आवाहन केले.

वाहनचालकांनी जबाबदारीने वाहन चालविल्यास ते आपल्‍याबरोबरच दुसऱ्याचाही जीव वाचवू शकतात असे सांगून बेदरकारपणे वाहन चालवल्याने अनेक युवकांनी जीव गमावले आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधले. प्रत्‍येकाने वाहतुकीचे नियम पाळावेत, त्‍यांचे उल्लंघन करू नये असे आवाहन यावेळी करण्‍यात आले. एनएसएस कार्यक्रम अधिकारी साहाय्‍यक प्राध्यापक राजेंद्र गवंडर यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Curchorem: कुडचडे रेल्वे स्टेशनलगतच्या शौचालयाची नळजोडणी तोडली, आस्थापनाची 2.75 लाखांची थकबाकी

Trump Tariff Policy: ट्रम्प यांची ‘टॅरिफ’ पॉलिसी फसली! अमेरिकेत वाढली बेरोजगारी, महागाईनेही गाठला नवा उच्चांक

School Discipline: कच्च्या मडक्यांना योग्य वळण देणारी शाळेची शिकवण; विद्यार्थी आणि शिक्षकांची अविस्मरणीय गाथा

रुद्रेश्वरासमोर दामू नाईकांचे 'मिशन 27'! प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस, भाजपने केला निवडणुकीचा श्रीगणेशा

Opinion: शिक्षण, संशोधन आणि कौशल्यविकासाच्या संगमातून भारताचा दबदबा; 'विक्रम' चिप ठरते स्वदेशी सामर्थ्याचे प्रतीक

SCROLL FOR NEXT