5G In Goa | 5G Internet in Goa | 5G services | DGP Jaspal Singh Dainik Gomantak
गोवा

5G In Goa: गोव्यात 5G सेवा येण्यापूर्वी पोलिस महासंचालकांचा गंभीर इशारा, म्हणाले...

सध्या लोकांना 5G चे फायदे आणि तोटे सांगण्याची गरज आहे.

Pramod Yadav

5G services: अतिप्रचंड वेगाने डिजिटल होणाऱ्या जगात हाय-स्पीड इंटरनेटचे महत्व वाढले आहे. हाय-स्पीड इंटरनेट सेवेच्या पार्श्वभूमीवर 4G नंतर 5G सेवेची चाचपणी सुरू झाली आहे. येत्या वर्षात देशातील काही शहरांमध्ये 5G सेवा सुरू होणार आहे. यामुळे मोबाईल युझर्सना हाय-स्पीड इंटरनेट सेवा मिळणार आहे. दरम्यान, गोव्यात 5G सेवा येण्यापूर्वीच पोलिस महासंचालक जसपाल सिंग (DGP Jaspal Singh) यांनी गंभीर इशारा दिला आहे. शुक्रवारी (दि.23) पार पडलेल्या गोवा पोलिस आयडियाथॉन-2022 मध्ये जसपाल सिंग बोलत होते.

Read more At:

https://www.aninews.in/news/national/general-news/5g-services-will-increase-cyber-crimes-in-goa-dgp-jaspal-singh20221224141807/)

सायबर क्राईम पोलिस स्टेशनने 5G सेवा सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि विविध एजन्सींसमोरील आव्हाने यावर आयडियाथॉनमध्ये जसपाल सिंग यांनी आपले विचार व्यक्त केले. पोलिस महासंचालक (डीजीपी) जसपाल सिंग म्हणाले, "हाय-स्पीड 5G सेवेमुळे मोठ्या प्रमाणावर सेवा डिजिटल होतील आणि इंटरनेटचा वेग प्रचंड वाढेल. इंटरनेट ऑफ थिंग्स यासारख्या गोष्टींचा वापर वाढेल. याचवेळी यासेवेचा गैरवापर करणारे समाजकंटक देखील सक्रिय होतील. अशी लोकं नेटवर्क हायजॅक करू शकतात. राज्यात 5G सेवा सुरू झाल्यानंतर सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होईल."

"सायबर क्राईमला प्रथम प्रतिसाद देणारे पोलिस असतात म्हणूनच उद्योग आणि शैक्षणिक समितीच्या लोकांशी संवाद साधण्याचा निर्णय आम्ही घेतला. या तज्ञ लोकं नागरिकांना 5G चे संपूर्ण दुष्परिणाम समजावून सांगतील. तसेच, लोकांनी 5G सेवेचा वापर करताना अधिक सावधगिरी बाळगण्यासाठी काय करावे याची माहिती देऊ शकतील. सध्या लोकांना 5G चे फायदे आणि तोटे सांगण्याची गरज आहे. कोणतेही तंत्रज्ञान 99.9 टक्के मानवांसाठी आणि समाजासाठी नेहमीच फायदेशीर असते. पण अशातही काही थोडे लोक तंत्रज्ञानाचा चुकीच्या पद्धतीने वापर करतात." असे जसपाल सिंग म्हणाले.

"तंत्रज्ञान नेहमीच वेगाने प्रगत होत असते. त्यामुळे माहिती आणि तंत्रज्ञान कायद्यात सुधारणा होण्याची शक्यता असून यात विविध कलमांचा समावेश केला जाईल. शारीरिक गुन्ह्यात, गुन्ह्याचे स्वरूप, व्यक्ती किंवा इतर बाबींचा समावेश असतो त्यामुळे त्याला ओळखने बऱ्याचवेळा सोपे असते. किंवा सीसीटीव्ही कॅमेर्‍यात चेहरा कैद झाल्यानंतर आरोपीला ट्रेस करता येऊ शकते. परंतु डिजिटल गुन्ह्यात, आरोपी 25,000 किमी दूर बसलेला असू शकतो आणि शोधणे खूप कठीण आणि गुंतागुंतीचे आहे." असे जसपाल सिंग म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT