Goa Police: अल्पवयीन चालकांवरील कारवाईला वेग; तीन ठिकाणच्या कारवाईत 33 वाहने जप्त

गोव्यात अल्पवयीन युवकांवरील कारवाईला वेग
Goa Police
Goa PoliceDainik Gomantak
Published on
Updated on

वाहतुकीला शिस्त लागावी, राज्यातील अपघात कमी व्हावेत यासाठी गोवा पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. राज्य सरकारने देखील अल्पवयीन मुले वाहन चालविताना आढळल्यास पालकावर थेट अटकेची कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर आज हणजूण, म्हापसा तसेच आगशी येथे कारवाई करत पोलिसांनी 33 वाहनांवर जप्तीची कारवाई केली आहे.

( police attach 33 vehicles for various offences including minors driving the two wheelers at Mapusa Agassaim Anjuna )

मिळालेल्या माहितीनुसार हणजूण पोलिसांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आज कारवाई केली आहे. यामध्ये 3 दुचाकी आणि 1 कार जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी आपली प्रक्रिया पुर्ण करत आवश्यक कार्यवाहीसाठी सविस्तर अहवाल न्यायालयासमोर सादर केला गेला आहे. व जप्त केलेल्या वाहनांची नोंदणी रद्द करण्यासाठी प्रादेशिक आरटीओ कार्यालयाला स्वतंत्र पत्रही पाठवण्यात आली आहे. अशी माहिती दिली आहे.

Goa Police
Pedne Special Children's Festival: खेळात हरलात तरी, इतरांची मने जिंका

याबरोबरच म्हापसा पोलिसांनी एम.व्ही. शाळेच्या परिसरात वाहन चालन नियमाचे उल्लंघन करणाऱ्या 11 मोटारसायकल चालकांवर कारवाई केली आहे. कारवाई केलेली वाहने अल्पवयीन मुले चालवत असल्याचे आढळून आले आहे. या कारवाईत शिक्षण विभाग आणि इतर प्राधिकरणांना अहवाल सादर करत एम.व्ही. शाळेच्या विद्यार्थी तसेच इतर संशयितांवर कारवाई करण्यात आली आहे.

Goa Police
New Year 2023: सावधान! नववर्षाच्या पूर्वसंध्येला किनारी भागात सुरक्षा कडक; पेट्रोलिंगसाठी पोलिस सज्ज

गोवा पोलिस महासंचालकांनी दिलेल्या माहितीनुसार आगशी येथे पोलिसांनी दुचाकी चालवणाऱ्या अल्पवयीन मुलांसह वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 18 वाहने जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई सुरुच राहणार असल्याने नागरीकांनी कटाक्षाने नियमांचे पालन करावे असेही पोलिसांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com