Union Minister Shripad Naik Dainik Gomantak
गोवा

Goa: विकासासाठी जनतेचे सहकार्य आवश्यक- श्रीपाद नाईक

असे आवाहन केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक (Union Minister Shripad Naik) यांनी बुधवारी वन-डिचोली येथे बोलताना केले.

दैनिक गोमन्तक

डिचोली: जनतेने सहकार्य केल्यास गावचा विकास करणे सोपे होते. त्यासाठी विकासकामांसाठी जनतेने सहकार्य करण्यासाठी पुढे यावे. असे आवाहन केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक (Union Minister Shripad Naik) यांनी बुधवारी वन-डिचोली येथे बोलताना केले. खासदार निधीतून उत्तर गोव्यात जवळपास एक हजार विविध विकासकामे तडीस नेण्यात आली आहेत. असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगून, खासदार निधीचा विकासकामांसाठी विनियोग करण्यात गोवा राज्य (State of Goa) उजवे ठरले असल्याचे सांगितले.

म्हावळींगे-कुडचिरे पंचायत क्षेत्रातील वन गावात खासदार निधीतून उभारण्यात आलेल्या स्मशानभूमी प्रकल्पाचे त्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात श्रीपाद नाईक प्रमुख पाहूणे या नात्याने बोलत होते. याप्रसंगी मयेचे आमदार प्रवीण झांट्ये, जिल्हा पंचायत सदस्य महेश सावंत, उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या माजी अध्यक्ष अंकिता न्हावेलकर, म्हावळींगे-कुडचिरेची सरपंच शीतल सावळ, कारापूर-सर्वणचे सरपंच गोकुळदास सावंत आदी उपस्थित होते. आमदार प्रवीण झांट्ये यांचेही यावेळी भाषण झाले.

मये मतदारसंघात (Maye Constituency) खासदार निधीतून विविध प्रकल्प साकारण्यात आल्याने त्यांनी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांना धन्यवाद दिले. यापुढेही मयेत महत्वाचे प्रकल्प आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शीतल सावळ यांनी स्वागत केले. यावेळी पंच आणि नागरिक उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: धक्का लागताच मेट्रोत दोन महिलांमध्ये तुफान हाणामारी, केस ओढत एकमेकींना बदडले; व्हायरल व्हिडिओ पाहून यूजर्स म्हणाले, 'रिअ‍ॅलिटी शो पेक्षाही डेंजर'

शिक्षण विभागाचा मोठा निर्णय! गोव्यात विद्यार्थ्यांचा प्रवास आता अधिक सुरक्षित; बस चालकांसाठी 'पोलीस व्हेरिफिकेशन' बंधनकारक

Surya Gochar 2026: 11 जानेवारीपर्यंत सूर्य देवाची विशेष कृपा! 'या' 3 राशींच्या नशिबात राजयोग; सोन्यासारखे चमकतील दिवस!

Konkan Tourism: गर्दीपासून दूर, निसर्गाच्या कुशीत! नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी कोकणातील 'ही' 5 शांत ठिकाणं आहेत बेस्ट

घराजवळ चर्च आहे का? गोव्यात घर घेतल्यानंतर अर्शद वारसीच्या सासू-सासऱ्यांनी त्याला पहिला प्रश्न काय विचारला? VIDEO

SCROLL FOR NEXT