Goa: अडवई सत्तरीत उगवते काळ्या तांदळाची भात शेती

सदर भाताच्या उत्पादनातून चांगला मोबदला मिळणार असल्याचे उदयसिंह राणे (Uday Singh Rane) यांनी बोलून दाखवले.
Agriculture
AgricultureDainik Gomantak
Published on
Updated on

पिसुर्ले: पर्ये मतदार संघातील (Parye Constituency) भिरोंडा पंचायत क्षेत्रात येणाऱ्या अडवई येथिल उदयसिंह राणे (Uday Singh Rane) यांनी सरकारांनी सुरू केलेल्या आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोवा (Goa) या संकल्पनेमुळे प्रभावित होऊन वाळपई कृषी खात्याच्या सहकार्याने बऱ्याच वर्षांनी सुमारे दीड हजार चौरस मीटर जमीनीत काळ्या जातीच्या भाताची लागवड करून या भागात अशा प्रकारच्या भाताच्या लागवडीचा पहिला प्रयोग सुरू केला आहे. सदर भाताच्या उत्पादनातून चांगला मोबदला मिळणार असल्याचे उदयसिंह राणे यांनी बोलून दाखवले.

राज्याची जीवन दाईनी म्हणून गणल्या जाणाऱ्या म्हादई नदीच्या काठावर वसलेल्या भिरोंडा पंचायत क्षेत्र हे कृषी संपन्न भाग म्हणून परिचित आहे, ऊस, काजू, नारळ, सुपारी, केळी लागवडीसह फळभाज्यांचे, भात, नाचणी पिकाचे उत्पादन घेण्यास अग्रेसर असलेल्या या पंचायत क्षेत्रातील नागरिक हे खरेच कष्टकरी शेतकरी आहेत, त्यामुळे बदलत्या काळात सुद्धा येथिल युवा पिढी कडून शेती व्यवसायाची पंरपरा कायम राखलेली दिसत आहे.

Agriculture
Goa: पर्यटन क्षेत्राला लवकरच चालना; केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक

परंतु वाढत्या रानटी जनावरांच्या दहशतीमुळे होणारे नुकसान, वाढती मजुरी आणि महत्त्वाचे म्हणजे शेती उत्पादनाला बाजारपेठेत मिळणारा कमी भाव, यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी शेती व्यवसायाकडे पाठ फिरवली आहे, त्यासाठी सरकारने योग्य नियोजन करून रानटी जनावरांपासून संरक्षण, मंजूरीसाठी अनुदान व शेती उत्पादनाला योग्य मोबदला मिळवून दिल्यास खऱ्या अर्थाने सरकारच्या धोरणानुसार शेतकरी आत्मनिर्भर भारतातील स्वयंपूर्ण शेतकरी होण्यास वेळ लागणार नाही असे मत उदयसिंह राणे यांनी व्यक्त केले.

Agriculture
Goa: सत्तरीच्या पर्ये, केरी, रावण भागात आज दिवसभर जोरदार पाऊस

या नवीन भात लागवडीच्या प्रयोगा संबंधी माहिती देताना उदयसिंह राणे या शेतकऱ्यांनी सांगितले की आपल्या मालकीच्या जागेत पुर्वीच्या काळापासून भात शेतीची लागवड करण्यात येत होती, परंतू नंतरच्या काळात शेती व्यवसाय आर्थिक दृष्ट्या परवडत नसल्याने ती काही काळ बंद ठेवण्यात आली होती, पण सध्या सरकारने शेतकऱ्यांना विविध योजना आखून शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण होण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देताना यंदा सुमारे दीड हजार चौरस मीटर जमीनीत काळ्या जातीच्या भाताची लागवड केली आहे, यासाठी 300 रूपये किलो या प्रमाणे 10 किलो भाताचा तरवा (रोपे) काढून वाळपई कृषी खात्याच्या मार्गदर्शनाखाली त्याची लागवड करण्यात आली आहे. सदर भाताच्या उत्पादनातून मिळणाऱ्या तांदूळला बाजारात चांगली मागणी व पाचशे रुपये किलो प्रमाणे भाव आहे. परंतु उत्पादन मिळे पर्यंत त्या भात पिकाची चांगली जोपासना करणे तेवढेच गरजेचे आहे.

Agriculture
Goa: मी लोबोंच्या विरोधात निवडणूक लढण्यास सक्षम : सुदेश मयेंकर

त्याच प्रमाणे सरकार शेतकऱ्यांना शेती व्यवसायाकडे वळवण्यासाठी विविध योजना आखून प्रोत्साहन देत आहे, पण त्याच प्रमाणे शेती उत्पादनाला योग्य भाव व बाजारपेठ उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, शेतकरी मोठ्या मेहनतीने शेती करून पिक काढतो मात्र त्या पिकांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळला नाही तर त्याला आर्थिक नुकसान सोसावे लागते परिणामी पुढच्या वर्षी तो शेतकरी शेती करण्यासाठी पुढे येत नाही.

त्यामुळे विद्यमान शेतकऱ्यांना कायम स्वरुपी शेती व्यवसायाकडे जोडून ठेवण्यासाठी सरकारने पंचायात पातळीवर नियोजन करून राज्य फलोत्पादन महामंडळाच्या माध्यमातून शेती व्यवसायामधून तयार होणाऱ्या उत्पादनांची उचल करून त्यांना योग्य भाव दिल्यास, येणाऱ्या काळात ग्रामीण भागांत बरेच युवा शेतकरी तयार होणार, तर शेत जमीन सुद्धा पडीक राहणार नाही. यासाठी कृषी मंत्र्यांनी लक्ष घालून सदर योजना राबविण्याची गरज आहे असे शेवटी उदयसिंह राणे यांनी सांगितले.

Agriculture
Goa: डिचोलीत पावसाचा रौद्रावतार, पुराचा धोका ?

हळसांदा उत्पादनाला योग्य भाव मिळाला नसल्याची खंत

या संबंधी उदाहरण देताना राणे यांनी सांगितले की गेल्या वर्षी काही जमीनीत हळसांदा पिकाची लागवड केली होती, त्यासाठी बियाणे विकत आणून मशागतीवर हजारो रुपये खर्च केले होते, त्यातून उत्पादनही चांगले मिळाले होते, परंतू बाजारात योग्य भाव मिळाला नाही, एरवी गावठी हळसाद्याला चांगली मागणी आहे व दुकानातून विकत घेताना बराच भाव आहे, पण शेतकरी ज्या वेळी माल विकायला बाजारात जातो त्यावेळी त्यांच्या मालाला योग्य दर मिळत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com