Goa Development Projects Dainik Gomantak
गोवा

Goa Development Projects: 'पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनामुळेच गोव्याचा विकास!' सड्या येथे इस्पितळाच्या भूमिपूजनाप्रसंगी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन

Double Engine Government Goa: सडा येथील इस्पितळासाठी सुमारे २६ कोटींचा खर्च होणार आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

वास्को: गोव्यात सुरू असलेली विकासकामे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनामुळे आणि केंद्र-राज्यातील ‘डबल इंजिन’ सरकारमुळे शक्य झाली आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रविवारी केले. सडा येथे सुमारे चार हजार चौरस मीटर क्षेत्रात उभारण्यात येणाऱ्या २० खाटांच्या इस्पितळाच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, खासदार सदानंद शेट तानावडे, आमदार संकल्प आमोणकर, मायकल लोबो, मुरगाव पालिका प्रशासक जयंत तारी, मुख्याधिकारी सिद्धिविनायक नाईक, डॉ. धर्मेंद्र प्रभुदेसाई, जयंत जाधव, डॉ. पूनम वेर्णेकर, रोहित कदम, सुनीता आरेकर यांची उपस्थिती होती.

मुख्यमंत्र्यांनी मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांच्या कार्याचे कौतुक करत, त्यांच्या पुढाकारामुळे मतदारसंघात अनेक विकासकामे मार्गी लागल्याचे सांगितले. मुरगावातील प्रदूषण कमी करण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलली असून, भविष्योन्मुख विकासावर भर देत असल्याचे त्यांनी सांगितले.

आरोग्य क्षेत्रात राज्य सरकारने अनेक लोकाभिमुख योजना राबविल्या असून, दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजनेसाठी दरवर्षी सुमारे ७० कोटी रुपये खर्च केले जात आहेत. या योजनांचा लाभ देताना धर्म किंवा जात पाहिली जात नसून ‘सबका साथ, सबका विकास’ या तत्त्वानुसार सरकार काम करत आहे.

- डॉ. प्रमोद सावंत, मुख्‍यमंत्री

सडा येथील इस्पितळासाठी सुमारे २६ कोटींचा खर्च होणार आहे. या प्रकल्पामुळे सडा व परिसरातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होतील. भविष्यात चिखली उपजिल्हा इस्पितळातही विविध सुविधा वाढविण्यात येणार असून, लोकांच्या दारापर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्यावर सरकारचा भर आहे.

- विश्वजित राणे, आरोग्यमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT