Goa Tourism Award Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: पर्यटनात गोव्याला मिळाला दुहेरी मुकूट! गोवा ‘डेस्टिनेशन ऑफ द इयर’; खंवटे ‘टुरिझम मिनिस्‍टर ऑफ द इयर’

Goa Tourism Award: शाश्‍‍वत, अनुभवाधारित आणि पुनरुत्पादक पर्यटनाच्या माध्यमातून राज्याने पर्यटन क्षेत्रात केलेल्या सकारात्मक बदलांची दखल घेत हा सन्मान देण्यात आला.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: जर्मनीतील आयटीबी बर्लिन या जागतिक प्रवास व पर्यटन प्रदर्शनादरम्यान आयोजित प्रतिष्ठित ‘पट्वा इंटरनॅशनल ट्रॅव्‍हल्‍स ॲवार्ड : २०२६ मध्ये गोवा आणि राज्याच्या पर्यटन नेतृत्वाला आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मानित करण्यात आले.

या पुरस्कार सोहळ्यात गोव्‍याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांना ‘टुरिझम मिनिस्‍टर ऑफ द इयर-इनोव्‍हेशन (आशिया)’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. गोव्यातील पर्यटन क्षेत्रात नवकल्पनात्मक उपक्रम राबवून सकारात्मक परिवर्तन घडवून आणणाऱ्या त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाची दखल घेत त्‍यांना हा सन्मान देण्यात आला.

याचवेळी गोव्याला ‘डेस्टिनेशन ऑफ द इयर : रिज्‍युव्‍हेनेशन’ हा पुरस्कारही प्रदान करण्यात आला. शाश्‍‍वत, अनुभवाधारित आणि पुनरुत्पादक पर्यटनाच्या माध्यमातून राज्याने पर्यटन क्षेत्रात केलेल्या सकारात्मक बदलांची दखल घेत हा सन्मान देण्यात आला.

गोवा पर्यटन विभागाने ‘गोवा समुद्रापलीकडे’ आणि ‘शाश्‍‍वत पर्यटन’ या संकल्पनांवर आधारित विविध उपक्रम राबवले आहेत. त्‍यात अंतर्गत व आध्यात्मिक पर्यटन, होमस्टे उपक्रमांना प्रोत्साहन, संस्कृतीकेंद्रित उत्सव आणि आंतरराष्ट्रीय पर्यटन संपर्क मजबूत करणे यांचा समावेश आहे.

हा सन्मान गोमंतकीय जनतेचा आहे. गोव्‍यातील पर्यटन हे केवळ पर्यटनस्थळांपुरते मर्यादित नसून ते स्थानिक समुदाय, संस्कृती आणि पर्यावरणाशी जोडलेले आहे. पर्यटनाचा लाभ प्रत्येक गोमंतकीयापर्यंत पोहोचेल अशा सर्वसमावेशक आणि शाश्‍‍वत विकास मॉडेलवर सरकार भर देत आहे.

- रोहन खंवटे , पर्यटनमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

Ranji Trophy Cricket: घरच्या मैदानावर गोव्याची रणजी मोहीम सुरू; अनुभवी बडोद्याशी पहिल्यांदाच रणजी लढत

SCROLL FOR NEXT