गोवा

Vishwajit Rane: रुग्णाशी केलेली गैरवर्तणूक दोन परिचारिका भोवली; आरोग्यमंत्र्यांनी केली 'ही' कारवाई

आरोग्यमंत्र्यांचा आदेश : कामचुकार कर्मचाऱ्यांची यापुढे गय केली जाणार नाही!

गोमन्तक डिजिटल टीम

Vishwajit Rane इस्पितळातील साधनसुविधा तसेच रुग्णांना देण्यात येणाऱ्या सेवेची पाहणी करण्यासाठी आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी आज अचानक बांबोळी येथील दंत महाविद्यालयाला भेट दिली.

यावेळी एका महिला रुग्णाने परिचारिकांच्या गैरवर्तणुकीबाबत मंत्र्यांकडे तोंडी तक्रार करताच तडकाफडकी सोनिया केरकर आणि निकिता नाईक यांना निलंबित करण्यात आले.

त्यांच्या निलंबनाचा आदेश इस्पितळाच्या डीन डॉ. आयडा यांनी काढला. रुग्णांशी गैरवर्तणूक करणाऱ्या व सेवेत कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा मंत्री राणे यांनी दिला.

आरोग्यमंत्री राणे यांनी डीन डॉ. आयडा यांच्यासमवेत इस्पितळाची पाहणी केली. तेथील सुविधा तसेच कमतरता असलेल्या उपकरणांचीही माहिती घेतली.

तोंडी तक्रारींचीही दखल घेणार

यावेळी एका महिला रुग्णाने परिचारिकांकडून केल्या जाणाऱ्या सतावणुकीबाबत माहिती दिली. राणे यांनी तिची कैफियत ऐकून त्या दोन परिचारिकांना चांगलेच धारेवर धरले. त्यांनी त्वरित डीन डॉ. आयडा यांना त्यांच्या निलंबनाचा आदेश काढण्याचा आदेश दिला.

रुग्णांकडून जरी तोंडी तक्रार आली असली, तरी कारवाई केली जाईल. त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याने चांगली सेवा करावी, अशी समज दिली.

दंत इस्पितळ २४ तास सुरू

या पाहणीवेळी काही बाबी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. त्याबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन चर्चा करून तोडगा काढण्यात येईल. या इस्पितळात मनुष्यबळाचीही समस्या आहे.

हे दंत इस्पितळ 24 तास सुरू ठेवण्याचे आपले प्रयत्न आहेत. रुग्णांना उच्च दर्जाची सेवा देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे मंत्री राणे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

South Africa Bar Shooting: बारमध्ये एन्जॉय करत होते लोक, अचानक अंदाधुंद गोळीबार; 17 जणांचा मृत्यू, 15 जखमी VIDEO

कुणबी साडीवर दावा कुणाचा?

Porvorim Flyover: पर्वरी येथील उड्डाणपुलावर स्पीड कॅमेरे असतानाही उल्लंघन, 10 दिवसांत 580 वाहनांनी ओलांडली वेगमर्यादा

Kushavati Mock Drill: 'कुशावती'त चार ठिकाणी 'मॉक ड्रिल', आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात सराव; प्रशासन तपासणार यंत्रणांची सज्जता

GMC Resident Doctors: निवासी डॉक्टरांसाठी 'गार्ड'ची लढाई, स्टायपेंड वाढीसह 'गोमेकॉ'तील डॉक्टरांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा

SCROLL FOR NEXT