Former corporator Krishna Salaskar walking around the city and spraying pesticides (Goa Dengue) Dainik Gomantak
गोवा

Goa Dengue: वास्को शहर व परिसरात डेंग्यू रुग्ण वाढताहेत

चिखली उपजिल्हा इस्पितळात दिवसागणिक 25 ते 30 डेंग्यू रुग्ण (Goa Dengue)

Dainik Gomantak

वास्को शहर व इतर परीसरात (Vasco city & nearby area) डेंग्यू रुग्णांची (Dengue Patient) संख्या वाढू लागली आहे. ज्यांचे रक्तबिंबिकाचे (Plates) प्रमाण कमी होते, त्यांना गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळामध्ये उपचारासाठी (Goa Medical Collage) पाठविण्यात येत असल्याची माहिती चिखली उपजिल्हा इस्पितळाचे (Chikhalim Sub district Hospital) प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल उम्रास्कर यांनी दिली. डेंग्यूचा प्रसार होऊ नये (Stop to spread of dengue), यासाठी शहर आरोग्य केंद्रातर्फे नागरिकांमध्ये जागृती निर्माण केली जात आहे. नवेवाडे येथे डेंग्यूचे रुग्ण वाढल्यावर स्थानिक नगरसेवकांनी ठिकठिकाणी जंतुनाशक फवारणीचे (Disinfectant spray) काम हाती घेतले होते. डेंग्यू, मलेरियाचा (Dengue & Malaria) प्रसार होऊ नये, यासाठी कोणती खबरदारी घ्यावी याची माहिती घरोघरी फिरून दिली होती. डासांना पिटाळून लावण्यासाठी जंतुनाशक धूर सोडण्याचे काम (Fogging) हाती घेण्यात आले होते. काही ठिकाणी ते अद्याप सुरूच आहे. मात्र, डेंग्यूचे रुग्ण कमी होताना दिसत नाहीत. (Goa Dengue)

चिखली उपजिल्हा इस्पितळात दररोज डेंग्यूसंबंधित उपचार घेण्यासाठी येणाऱ्यांची संख्या पंचवीस ते तीस आहे. रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण वाडे, नवेवाडे, दाबोळी, बोगमाळी, झुआरीनगर व परिसरातील असतात. दररोज डेंग्यूचे रुग्ण येऊ लागल्याने चिखली उपजिल्हा रुग्णालयातील खाटा भरल्या आहेत. ज्यांच्या रक्तातील रक्तबिंबिका कमी झाल्याचे दिसून येते, ज्यांना अधिक उपचाराची गरज आहे. त्यांना गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळामध्ये पाठविण्यात येत असल्याचे डॉ. उम्रास्कर यांनी सांगितले.

डेंग्यू मलेरियाचा प्रसार होऊ नये यासाठी नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. डासांच्या पैदास स्थळांची विल्हेवाट लावावी असे आवाहन माजी नगरसेवक कृष्णा साळकर यांनी केले आहे. डेंग्यू रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याची दखल घेऊन साळकर यांनी शहर भागात ठिकठिकाणी भेटी दिल्या. तेथे असलेल्या डास पैदास स्थळांची स्वच्छता करण्यात येऊन जंतुनाशक औषधाची फवारणी करण्यात आली. करवंट्या टीन यांची विल्हेवाट लावण्यात आली. हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाकीची पहाणी करून त्यांना काही सूचना केल्या. काही हॉटेल मालकांनी शीतपेयांच्या बाटल्या उघड्यावर ठेवल्या होत्या त्यामध्ये पावसाचे पाणी जमा होऊन त्यामध्ये डासांची पैदास होण्याची शक्यता होती. संबंधितांना बाटल्या क्रेटमध्ये उलट्या करून ठेवण्याची सूचना करण्यात आली. आम्ही ठिकठिकाणी जंतूनाशक फवारणी मारण्याचे व डासांना पिटाळून लावणारा धूर सोडण्यास आरंभ केल्याचे साळकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT