Goa Mask Scam
Goa Mask Scam Dainik Gomantak
गोवा

Goa Mask Scam: कुडचडे पालिकेच्या माजी नगराध्यक्षाला मास्‍क घोटाळा भोवणार!

दैनिक गोमन्तक

कुडचडे : माजी नगराध्यक्ष बाळकृष्ण होडारकर यांच्‍या काळात 80 हजार रुपयांचा मास्क (Mask)घोटाळा झाला आहे. या घोटाळ्‍याची पालिका अधिकाऱ्यांनी कसून चौकशी केली पाहिजे. तसेच काही माजी नगरसेवक कंत्राटदारांच्या नावे बनावट सही करून काम पूर्ण झाल्यानंतर सुरक्षा हमी म्हणून शिल्लक राहिलेली रक्कम उकळण्यासाठी प्रयत्न करत आहेत, असा सनसनाटी आरोप कुडचडेचे (Kudchade municipal) नगराध्यक्ष विश्वास सावंत यांनी मंगळवारी झालेल्‍या पालिका मंडळाच्‍या बैठकीत केला. त्‍यामुळे ही बैठक बरीच वादळी ठरली. विरोधकांनीही सत्ताधारी पालिका मंडळावर प्रश्‍‍नांची सरबत्ती केली. तसेच बनावट दाखला प्रकरण लावून धरले. (Goa: Demand for inquiry into mask scam in Kudchade municipal meeting)

कुडचडे पालिका मंडळाची खास बैठक पालिका सभागृहात पार पडली. बैठकीला सर्व नगरसेवक, पालिकाधिकारी नीलेश धायगोडकर, स्थानिक आमदार तथा वीजमंत्री नीलेश काब्राल उपस्थित होते.

पालिकेने सर्व दुकानदारांना करार पद्धतीने पर्यायी जागा उपलब्ध करून दिली आहे. त्‍यामुळे नवीन मार्केट इमारतीचा विषय लवकरच मार्गी लागेल. तसेच कारेमड्डी येथे पालिकेने बांधलेली व्‍यायामशाळा खुली करण्‍याचा ठराव आणि सुडा मार्केटचे नूतनीकरण करून ते हस्‍तांतरीत करण्याचा प्रस्‍तावही मंजूर करण्‍यात आला, असे सावंत म्‍हणाले.

त्यानंतर बनावट दाखला प्रकरण कुठवर पोहोचलेय याबाबत विरोधी नगरसेवकांनी प्रश्‍‍न उपस्‍थित केला असता, त्या प्रकरणासाठी कारकून पोलिसांत तक्रार करू शकत नाही, परिणामी त्‍याने तक्रार मागे घेतल्याचे सांगण्‍यात आले. यावर नगरसेवक प्रदीप नाईक यांनी ‘कारकून तक्रार करू शकत नसल्यास आता नव्याने तुम्ही तक्रार करा. कारण नगराध्यक्ष असताना तुमच्या नावाने बनावट दाखला प्रकरण घडले आहे’ असे सुनावले असता सत्ताधारी मंडळ गप्‍प झाले. दरम्‍यान, वीजमंत्री काब्राल यांना बैठकीनंतर प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले की, पालिका मंडळाने आज चांगले निर्णय घेतले आहेत. मार्केट विषय लवकरच सुटणार आहे.

"नवीन मार्केट इमारतीचा विषय लवकरच मार्गी लागणार आहे. तसेच कारेमड्डी येथे पालिकेने बांधलेली व्‍यायामशाळा खुली करण्‍याचा ठराव पालिका बैठकीत मंजूर करण्‍यात आला आहे. मात्र मागच्‍या पालिका मंडळाने केलेल्‍या मास्‍क घोटाळ्‍याचा तपास व्‍हायलाच पाहिजे."

- विश्वास सावंत, नगराध्यक्ष

"आपल्या कारकीर्दीत जर 80 हजार रुपयांचा मास्क घोटाळा झाला असले तर त्‍या प्रकाराची सखोल चौकशी कराच. गरज पडल्‍यास सीबीआयमार्फत चौकशी करा. विनाकारण कोणत्‍याही गोष्‍टीचे राजकारण करू नका. मात्र, बनावट दाखला प्रकरणाची चौकशी ही झालीच पाहिजे."

- बाळकृष्ण होडारकर, माजी नगराध्यक्ष

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT