Delta Corp GST notice Goa 2026 Dainik Gomantak
गोवा

डेल्टा कॉर्पला 1752 कोटींची जीएसटी नोटीस, प्रकल्पाला ब्रेक; जुलै 2017 ते मार्च 2022 कालावधीसाठी कर मागणी

Delta Corp GST notice Goa 2026: गेमिंग ऑपरेटर ‘डेल्टा कॉर्प’ला गोवा सरकारच्या वाणिज्य कर आयुक्त कार्यालयाकडून सुमारे १७५२ कोटी रुपयांच्या जीएसटी थकबाकीची नोटीस प्राप्त झाली आहे.

Sameer Amunekar

पणजी: गेमिंग ऑपरेटर ‘डेल्टा कॉर्प’ला गोवा सरकारच्या वाणिज्य कर आयुक्त कार्यालयाकडून सुमारे १७५२ कोटी रुपयांच्या जीएसटी थकबाकीची नोटीस प्राप्त झाली आहे. कंपनीने भांडवली बाजाराला दिलेल्या निवेदनातून ही माहिती जाहीर केली असून, जीएसटी कमी भरल्याचा आरोप करण्यात आला आहे.

ही नोटीस जुलै २०१७ ते मार्च २०२२ या कालावधीसाठी असून, यापूर्वी देण्यात आलेल्या तत्सम मागण्यांप्रमाणेच असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. त्या मागण्यांविरोधात कंपनीने न्यायालयात आव्हान दिले असून, सध्‍याची नोटीसही त्याच वादाचा भाग असल्याचे सांगितले आहे.

याआधी २०२३ मध्ये हैदराबाद येथील जीएसटी इंटेलिजन्स महासंचालनालयाने कंपनीला तब्बल ११,४०० कोटी रुपयांची कर थकबाकीची नोटीस बजावली होती. ही रक्कम कंपनीच्या बाजारमूल्याच्या जवळपास तीनपट असल्याचे नमूद करण्यात आले होते. कंपनी आणि तिच्या उपकंपनीने या मागण्यांविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

आधीची ११,४०० कोटींची नोटीस

२०२३ मध्ये जीएसटी इंटेलिजन्स महासंचालनालयाने डेल्टा कॉर्पला ११,४०० कोटी रुपयांची नोटीस दिली होती. ही रक्कम कंपनीच्या बाजारमूल्याच्या जवळपास तीनपट असल्याने उद्योगात खळबळ उडाली होती.

कर गणनेवरून वाद

कंपनीच्या मते, जीएसटीची गणना केवळ ‘ग्रॉस गेमिंग रेव्हेन्यू’वर व्हावी. मात्र, कर विभाग कॅसिनोतील एकूण पैज मूल्यावर कर लावत असल्याने हा वाद निर्माण झाला असून, यावर न्यायालयीन सुनावणी सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cutbona Jetty: कुटबण जेटीवर अस्वच्छतेचे साम्राज्य! आरोग्य खात्याच्या पाहणीत अनेक त्रुटी उघड; पाणीपुरवठ्या अभावी कामगारांचे हाल

म्हापसा नालेसफाईचा केवळ फार्स? पावसाळ्यापूर्वी प्रशासनाचा चालढकलपणा; नाल्यातील गाळ काठावरच ठेवल्यानं 'टुगेदर फॉर म्हापसा' संघटनेचा संताप

Goa Assembly Elections 2027: सासष्टीचा 'तो' बालेकिल्ला काँग्रेस पुन्हा जिंकणार? 2027 कडे सर्वांचे लक्ष; नुवे, बाणावली, कुडतरी आणि वेळ्ळी मतदारसंघांत पुन्हा एकदा चुरशीची लढत

Shocking News: रागाचा झटका बेतला जिवावर! स्वतःचा प्रायव्हेट पार्ट कापून देवाला केला अर्पण; बायकोसोबतच्या वादातून 25 वर्षीय तरुणानं उचललं टोकाचं पाऊल

Goa Human Trafficking: हरमल वेश्याव्यवसाय प्रकरणात दोन संशयितांना जामीन, ठोस पुराव्यांचा अभाव; पीडित महिलांनी साक्ष देण्यास दिला नकार

SCROLL FOR NEXT