Goa : Goa Tourism Development Corporation Chairman Dayanand Sopte while inaugurating the toilet on the shores of Palolem Cancona. On the side are Deputy Speaker Ijidor Fernandes and other dignitaries. Dainik Gomantak
गोवा

Goa : पाळोळेत प्रसाधनगृहाचे लोकार्पण

Goa : दयानंद सोपटे यांच्‍या हस्‍ते उद्‍घाटन : पालिका मंडळाला निमंत्रण नाहीच

Mahesh Tandel, Subhash Mahale

काणकोण : काणकोणमधील पालिका क्षेत्रातील पाळोळे (Palolem Cancona) किनाऱ्यावरील प्रसाधन गृहाचे (Toilet & Bath Rooms) उद्‍घाटन विनाव्यत्यय आज (ता.१७) पार पडले. पालिका सत्ताधारी गटाने या उद्‍घाटनावर निमंत्रण नसल्याचे कारण पुढे करून कार्यक्रमावर बहिष्कार घातला. मात्र या उद्‍घाटन सोहळ्याला नगरसेवक हेमंत नाईक गावकर, धिरज नाईक गावकर, नीतू समीर देसाई, सुप्रिया शेखर नाईक गावकर, शुभम कोमरपंत हे बारापैकी पाच नगरसेवक उपस्थित होते.

काणकोण पालिका क्षेत्रात ८८ लाख रूपये खर्चून पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी बहुउद्देशीय प्रसाधन प्रकल्प येथील लोकप्रतिनिधी व जनतेच्या मागणीनुसार उभारण्यात येऊन त्याचे आज लोकार्पण झाले. मात्र, पालिका सत्ताधारी गटाचे नगरसेवक या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्‍याने याचा अर्थ जनतेने काय काढायचा, असा प्रश्न पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष दयानंद सोपटे यांनी प्रसाधनगृहाचे उद्‍घाटन केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात व्यक्त केला. या कार्यक्रमाला पर्यटन विकास महामंडळाचे किरण कुमार, मयेकर व अन्य अधिकारी उपस्थित होते.

नगरसेवकांना दूरध्‍वनीवरून निमंत्रण?
यावेळी उपसभापती व काणकोणचे आमदार इजिदोर फर्नांडिस यांनी लोकप्रतिनिधीला सत्ताधारी व विरोधी गट यामध्ये फरक करून चालत नाही. निवडणूक झाल्यानंतर हा विषय संपुष्टात येतो. सत्ताधारी गटाबरोबरच विरोधी गटाच्या नगरसेवकांना दूरध्वनीवरून उद्‍घाटनाचे निमंत्रण दिले होते. विरोधी गटाच्या पाच नगरसेवकांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. काणकोण पालिका क्षेत्राचा विकास सर्व नगरसेवकांनी एकोप्याने करण्याची गरज असल्‍याचे फर्नांडिस यांनी सांगितले.

प्रसाधनगृह : ८८ लाख रु. खर्च
सुविधा : स्तनपान कक्ष, कपडे बदलण्याचा कक्ष
चाळीस लॉकर्स महिला
पुरुषांसाठी प्रसाधनगृहाची सोय
ताबा : पर्यटन विकास महामंडळाकडे राहणार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Petrol Diesel Prices In Goa: महाराष्ट्र, कर्नाटकपेक्षा गोव्यात पेट्रोल - डिझेल स्वस्त; जाणून घ्या ताजे भाव

Junta House: ‘पणजीतील जुन्‍ता हाऊस 30 दिवसांत रिकामे करा’, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश; इमारतीचे होणार नूतनीकरण

Goa News Live: सराईत गुंड 'टारझन' विरोधात हत्यार कायद्याखाली गुन्हा; अड्डयावर सापडली तलवार

DSSY चे 13 हजार बोगस लाभार्थी! समाजकल्याण खात्यातर्फे पडताळणी; 50 कोटी रुपयांची वसूली

Gas Cylinder Seizure: 1021 पैकी 485 सिलिंडर रिकामे, वजनमाप खात्‍याकडून मोजणी; अहवाल मिळाल्‍यानंतर पोलिस करणार कारवाई

SCROLL FOR NEXT