Goa: ग्रामीण स्वच्छता अभियानाचा मुख्यमंत्र्यांनी केला शुभारंभ

बायो-मेडिकल, रसायनसह ई-कचऱ्यावरील प्रकिया प्रकल्प उभारण्याचा सरकारचा विचार आहे. असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी कासारपाल-डिचोली येथे बोलताना सांगितले आहे.
Chief Minister Dr. Pramod Sawant
Chief Minister Dr. Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: कचऱ्याचे व्यवस्थित व्यवस्थापन करून स्वच्छतेवर सरकार अधिक भर देत आहे. त्यासाठी आपले सरकार करोडो रुपये खर्च करीत असून, राज्यात घन कचरा प्रक्रिया प्रकल्पाबरोबरच बांधकाम, बायो-मेडिकल, रसायनसह ई-कचऱ्यावरील प्रकिया प्रकल्प उभारण्याचा सरकारचा विचार आहे. असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी कासारपाल-डिचोली (Kasarpal-Dicholim) येथे बोलताना सांगितले आहे.

'स्वच्छ भारत मिशन' (Swachh Bharat Mission) अंतर्गत राज्यव्यापी 'ग्रामीण स्वच्छता अभियान'च्या शुभारंभप्रसंगी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत प्रमुख पाहूणे या नात्याने बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिनानिमित्त डिचोली मतदारसंघातील लाटंबार्से पंचायतीतून शुक्रवारी (ता.17) या अभियानची सुरवात करण्यात आली. आपला गाव स्वच्छ आणि निरोगी ठेवणे ही गावातील लोकप्रतिनिधींसह प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे. असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगून, सरकारी उपक्रमांचा लाभ घेत राज्याला स्वयंपूर्ण करण्यासाठी प्रत्येकांनी पुढाकार घ्यावा. असे आवाहन केले.

Chief Minister Dr. Pramod Sawant
Goa: आयुष डॉक्टर्स वाढीव पगाराच्या प्रतिक्षेत

कासारपाल येथे पंचायत सभागृहात आयोजित कार्यक्रमप्रसंगी डिचोलीचे आमदार तथा सभापती राजेश पाटणेकर हे उपस्थित होते. अन्य मान्यवरात जिल्हा पंचायत सदस्य महेश सावंत आणि प्रदीप रेवाडकर, पंचायत सचिव संजय जागीर, पंचायत संचालक सिद्धी हळर्णकर, लाटंबार्सेचे सरपंच ज्ञानेश्वर गावस, मुळगावचे सरपंच गजानन मांद्रेकर आणि मेणकूरेची सरपंच संजना नाईक यांचा समावेश होता.

कचरा व्यवस्थापनाबाबतीत प्रथम

साळगाव येथे उभारण्यात आलेला घन कचरा व्यवस्थापन प्रक्रिया प्रकल्पातून खत आणि वीज निर्मिती होत आहे. हा प्रकल्प केवळ देशातच नव्हे, तर आशिया खंडात प्रथम आहे. असे मुख्यमंत्री म्हणाले. कचरा व्यवस्थापन महामंडळ आणि मंत्रालय स्थापन करणारे गोवा हे पहिले राज्य असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. येत्या 31 ऑक्टोबरपर्यंत सरकारने लसीकरणाचा दुसरा डोस पूर्ण करण्याचे सरकारने लक्ष्य ठेवले असून, त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Chief Minister Dr. Pramod Sawant
Goa: केवायसीचे कारण पुढे करत बँकेतून 73 हजार रुपये केले लंपास

तरच संकल्पना यशस्वी-सभापती

प्रत्येकाने जर आपल्यापासून सुरवात करून आपला परिसर स्वच्छ ठेवला, तर 'स्वच्छ भारत'ची संकल्पना नक्कीच यशस्वी होईल. असा आशावाद सभापती राजेश पाटणेकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त करून, ग्रामीण स्वच्छता अभियानचे कौतुक केले.

मुरगावचे गट विकास अधिकारी प्रसिद्ध नाईक यांनी स्वागत आणि सूत्रसंचालन केले. लाटंबार्सेची पंच कुंदा च्यारी यांनी आभार मानले.

Chief Minister Dr. Pramod Sawant
Goa: मुख्यमंत्र्यांनी डिचोली पोलिस स्थानकातील गणरायाचे घेतले दर्शन

अभियानचा शुभारंभ

सभापती राजेश पाटणेकर यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हिरवा बावटा दाखवून 'ग्रामीण स्वच्छता अभियान'अंतर्गत 'स्वच्छता ही सेवा' उपक्रमाचा शुभारंभ केला. पंचायत खाते आणि ईपीएल कंपनीच्या सहकार्याने हे अभियान हाती घेण्यात आले आहे. यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते विविध पंचायतींच्या सरपंचांना झाडांच्या रोपट्यांचे वितरण केले. या कार्यक्रमास पंचायत खात्याचे अधिकारी, विविध पंचायतींचे सरपंच आणि पंचसदस्य, ईपीएल कंपनीचे अधिकारी, भाजप कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com