Goa Crime Cases Dainik Gomantak
गोवा

Goa Crime Case on Rise : गोव्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले, सव्वातीन वर्षात आढळले 1298 मृृतदेह

गुन्हेगारीचेही प्रमाण वाढले : 550 जणांची ओळख न पटल्याने बेवारस नोंदवून केले अंत्यविधी

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Crime Case on Rise : गत सव्वातीन वर्षांत राज्यभरात 1 हजार 298 मृतदेह सापडले. त्यापैकी 550 मृतदेहांची ओळख न पटल्याने त्यांना बेवारस घोषित करून अंत्यविधी करण्यात आला. अनोळखी मृतदेहांत बहुतांश वेळा अपघात, नैसर्गिक, आत्महत्या, इतर कारणांचा समावेश असतो. दरम्यान, याच कालावधीत राज्यातील ९४ अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याची नोंद आहे.

विधानसभेत देण्यात आलेल्या माहितीन्वये 2020 मध्ये 354 मृतदेह सापडले होते2022 मध्ये हा आकडा आणखी वाढून तो 437 वर गेला होता. तर यावर्षी मार्च मध्यान्हपर्यंत 83 वर गेली आहे. ज्या मृतदेहांची ओळख पटवणे पोलिसांना तपासकामाद्वारे शक्य झाले नाही, ते बेवारस ठरवण्यात येत आहेत.

अनेकदा हे अनोळखी असलेले मृतदेह हे परप्रांतिय मजुरांचे असतात. त्यामुळे त्यांची तक्रारही कोणी देत नाही. अशा बेवारस, अनोळखी मृतदेहाची माहिती सर्व पोलिस स्थानकांना बिनतारी संदेशद्वारे पाठवली जाते. ६ महिने त्याची माहिती पुढे न आल्यास त्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास प्रक्रिया सुरू होते.

ओळख न पटलेले मृतदेह

साल संख्या

2020 354

2021 424

2022 437

2023 83

अल्पवयीन बलात्कार प्रकरणे

34 2021

48 2022

13 2023

94 मुलींचे अपहरण

राज्यात 2021 पासून ते मार्च 23 मध्यान्हपर्यंत अल्पवयीन मुलींच्या अपहरणाची 94 प्रकरणे नोंद झाली आहेत. 2021 मध्ये 34 तर 2022 मध्ये 48 प्रकरणांचा समावेश आहे. यावर्षी आतापर्यंत 12 प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणांमध्ये काहीवेळा मुली स्वतःहून संशयितासोबत गेलेल्या असतात. मात्र, त्या अल्पवयीन असल्याने तांत्रिकदृष्ट्या तो गुन्हा ठरतो.

देहविक्रीचे 25 गुन्हे

2021 पासून ते आतापर्यंत देहविक्रीची 25 प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याच कालावधीत 160 बलात्कार व 75 खुनांची नोंद झाली आहे. गेल्या वर्षभरात देहविक्रीप्रकरणी क्वचितच गुन्हा दाखल झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात संगनमत असल्यास तो गुन्हा ठरू शकत नाही, असे स्पष्ट केल्याने पोलिसांनी या प्रकरणाकडे पाठ केली आहे.

उपाययोजना

  • गुन्हे कमी करण्यासाठी व रोखण्यासाठी पोलिस गस्त तसेच अचानक रात्रीच्यावेळी नाकाबंदी केली जाते. संशयास्पद व्यक्ती आढळून आल्यास त्याची चौकशी करण्यात येते.

  • रात्री उशिरा फिरणाऱ्या लोकांची, वाहन चालकांची तपासणी केली जाते. बीट पोलिसांच्या मदतीने भाडेकरून म्हणून राहत असलेल्यांची तपासणी करण्यात येत आहे.

  • काही गुन्ह्यांत शिक्षा भोगून बाहेर आलेल्या, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या संशयितांना स्थानकावर बोलावून त्यांना तंबी दिली जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT