Davorlim Murder Case Dainik Gomantak
गोवा

Davorlim Murder Case: भावाच्‍या खुनाच्या बदल्याची तीन वर्षे तयारी; सादिकच्या खुनामागचा 'असा' आहे रक्तरंजित इतिहास

आठवडाभर रेकी : आधीच विकत घेतलेल्‍या कोयत्‍याने सादिकला संपवले; कर्नाटकात बसले लपून

गोमन्तक डिजिटल टीम

Davorlim Murder Case तीन वर्षांपूर्वी भावाचा खून केल्‍याने त्‍याचा बदला घेण्‍यासाठी कादर खान खानजादे हा रागाने बेभान झाला होता. या खुनाचा बदला कधी तरी घेणारच, असा ‘पण’ त्‍याने तीन वर्षांपूर्वीच केला होता.

अखेर शुक्रवारी त्‍याच्‍या भावाचा मारेकरी सादिक बळ्‍ळारी हा एकटाच घरी असल्‍याचे दिसून आल्‍यावर त्‍याने मित्र तौसिफ कडमणी ऊर्फ टायगर याला साथीला घेऊन सादिकचा काटा काढला. हा खून करण्‍यासाठी त्‍याने तीन वर्षांपूर्वीच कोयता विकत घेऊन ठेवला होता, अशी माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे.

मे 2020 मध्‍ये कादर खानचा भाऊ मुजाहिद याचा भगवती कॉलनीत निर्घृण खून करण्‍यात आला होता. त्‍या प्रकरणात नंतर सादिकला अटक करण्‍यात आली होती.

दोन महिन्‍यांपूर्वी सादिक जामिनावर सुटला होता. त्‍याला एकटे गाठून त्‍याचा खात्‍मा करायचा याची वाट पाहात कादर खान थांबला होता, अशी माहिती मिळाली.

नियोजनपूर्वक केला ‘गेम’

दाेन महिन्‍यांपूर्वी सादिक जामिनावर सुटल्‍यानंतर त्‍याचा कधी तरी खात्‍मा करायचाच, असे ठरवून कादर खान संधीची वाट पाहात होता. सादिकवर नजर ठेवण्‍यासाठी आठ दिवसांपूर्वीच त्‍याने सादिकच्‍या घराजवळ भाड्याची खोली घेऊन तो तेथे राहात होता.

बरेच दिवस रेकी केल्यानंतर शुक्रवारी त्याने सादिकचा गेम केला. झोपेत असलेल्या सादिकवर कादरने कोयत्याने वार करून त्याला संपवले. त्यावेळी तौसिफ उर्फ टायगर हा सादिकच्या घराबाहेर उभा होता.

पश्‍चात्तापाचा लवलेशही नाही

शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास सादिकचा खून करून कादर आणि तौसिफ दुचाकीवरून कदंब बस स्थानकावर आले. दुचाकी तिथेच टाकून त्यांनी कर्नाटकला जाणारी बस पकडली आणि ते थेट कादरच्या सौनूर गावात दाखल झाले.

आपण केलेल्या कृत्याचा त्यांना अजिबात पश्‍चात्ताप नव्हता. गावातील अन्य तिघांना घेऊन ते दारू ढोसत बसले होते. खून करून आलो आहोत, हे त्यांनी आपल्या मित्रांनाही सांगितले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kasaarvarne School Vandalism: कासारवर्णेच्या शाळेत तोडफोड; खिडक्यांच्या काचा फोडल्या, नळाची जोडणीही तोडली, पोलिसांत तक्रार

Viral Stunt Video: पठ्ठ्यानं 'नागराजा'सोबत घेतला पंगा, जीवघेणा स्टंट व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'अरे भाई, हा जिवंत आहे की गेला'?

भारतासाठी खूशखबर! कॅन्सर आणि दुर्मिळ आजारांच्या औषधांना 100 टक्के टॅरिफमधून सूट, अमेरिकेत भारतीय औषधांची निर्यात होणार सोपी

Viral Post: "आई-वडिलांना देव मानू नका..." CEO च्या 'त्या' वादग्रस्त पोस्टने खळबळ; सोशल मीडियावर दोन गटांत जुंपली, वाचा संपूर्ण प्रकरण

Election Commission: धुके दाटलेले... निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासाचा कस

SCROLL FOR NEXT