Goa Dams Water storage Dainik Gomantak
गोवा

Goa Dams Water storage: जून अर्धा संपला, धरणे मात्र रिकामीच! राज्यातील जलसाठ्यांची चिंताजनक स्थिती, साळावली धरणात फक्त 28 टक्के पाणी

salaulim dam water level: एल निनो प्रभाव आणि अन्य प्रकारामुळे पाऊस लांबणीवर गेला असताना त्याचा परिणाम राज्यातील जल साठ्यांवर दिसू लागला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: एल निनो प्रभाव आणि अन्य प्रकारामुळे पाऊस लांबणीवर गेला असताना त्याचा परिणाम राज्यातील जल साठ्यांवर दिसू लागला आहे. बहुतांश दक्षिण गोव्याला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या साळावली धरणात सध्या फक्त २८ टक्के पाणीच शिल्लक आहे. सध्या या जलाशयातील पाण्याची पातळी ३०.९ मीटर एवढी पोहोचली आहे.

दक्षिण गोव्यातील पंचवाडी धरणात तर केवळ २० टक्के पाणी उपलब्ध आहे. काणकोणमधील चापोली धरणात ४१ टक्के पाणी बाकी असून गावणे धरणात ४४ टक्के पाणी शिल्‍लक आहे.

जून मध्‍यावर येऊनही गोव्‍यात अजून पाऊस सुरू न झाल्‍याने ही स्‍थिती उद्‍भवली आहे. आतापर्यंत अपेक्षित पावसाच्‍या प्रमाणात ४५ टक्‍के घट झाली आहे. त्‍यामुळे जलाशयातील पाणी कमी होऊ लागले आहे. असे जरी असले तरी साळावली धरणात असलेले पाणी जून अखेरपर्यंत पुरेल एवढे आहे अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.

वास्‍तविक साळावलीचे धरण जुलैच्‍या पहिल्‍या आठवड्यात पूर्णपणे भरून वाहू लागते. जुलैमध्ये या धरणाची विहिर भरून ती ओसंडू लागते. मात्र यावर्षी पाऊसच न पडल्‍याने हे धरण काही प्रमाणात आटू लागले आहे. २०२३ सालीही अशीच परिस्‍थिती होती. त्‍यानंतर तीन वर्षांनी पुन्‍हा एकदा अशी परिस्‍थिती उद्‍भवल्‍याचे या सूत्रांनी सांगितले.

दक्षिण गोव्‍याच्‍या तुलनेत उत्तर गोव्‍यातील स्‍थिती अधिकच चिंता करण्‍यासारखी असून सत्तरी तालुक्‍याला पाणीपुरवठा करणाऱ्या अंजुणे जलाशयात फक्‍त ११ टक्‍के पाणी बाकी असून या जलाशयातून केलेल्‍या पाणी पुरवठ्याला काही प्रमाणात दुर्गंधीही येऊ लागली आहे अशा तक्रारी स्‍थानिकांकडून केल्‍या जात आहेत.

पेडणे आणि बार्देश तालुक्‍याला पाणी पुरवठा करणाऱ्या तिळारी धरणात अजून ३१ टक्‍के पाणी बाकी आहे. गोव्‍यात मे ते जून या काळात जलाशयाची पाणी पातळी खाली जाते. जूनमध्ये वेळेवर पाऊस पडल्‍यास जुलैपर्यंत या धरणांतील पाणी वाढते. यंदा कमी पाऊस पडेल, अशी शक्‍यता वर्तवली गेल्‍याने भविष्‍यात पाणीटंचाई भासू शकते, अशी शक्‍यता सध्‍या व्‍यक्‍त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT