Goa Dams Dainik Gomantak
गोवा

Goa Water Crisis: गोव्यातील बहुतांश धरणातील पाण्याची पातळी 40 टक्क्यांच्या खाली, पण सरकार म्हणतंय, 'पिण्याच्या पाण्याची चिंता नको'

Goa Government Water Assurance: गोव्याच्या बहुतांश धरणांमधील पाण्याची पातळी 40 टक्क्यांच्या खाली गेली असतानाही, राज्य सरकारने नागरिकांना खात्री दिली आहे की उन्हाळ्याच्या कडाक्याच्या महिन्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची कोणतीही टंचाई भासणार नाही.

Manish Jadhav

पणजी: गोव्याच्या बहुतांश धरणांमधील पाण्याची पातळी 40 टक्क्यांच्या खाली गेली असतानाही, राज्य सरकारने नागरिकांना खात्री दिली आहे की उन्हाळ्याच्या कडाक्याच्या महिन्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची कोणतीही टंचाई भासणार नाही.

जलसंपदा मंत्री सुभाष शिरोडकर यांनी जनतेला आश्वस्त करत सांगितले की, सध्या उपलब्ध असलेले पाणी गोव्याच्या पिण्याच्या पाण्याच्या (Water) गरजा भागवण्यासाठी पुरेसे आहे. “सध्या आमच्याकडे असलेले पाणी 150 दिवसांसाठी पुरेसे आहे. पुढील किमान तीन महिने तरी चिंता करण्यास काहीही कारण नाही,” असे त्यांनी सांगितले.

शिरोडकर यांनी स्पष्ट केले की, सरकार (Government) परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि गरज भासल्यास आवश्यक उपाययोजना करण्यासाठी सज्ज आहे. तसेच प्रशासनाने नागरिकांना पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन केले आहे.

गेल्या जवळपास तीन महिन्यांपासून हवामानात बदल होताना उष्णतेने कहर केला असला, तरी धरणातील जलसाठ्यात मोठी घट झाली आहे. गेल्यावर्षी चांगला मोसमी पाऊस पडल्यानंतर आमठाणे धरणातील जलसाठ्याची पातळी समाधानकारक होती. गेल्यावर्षी पावसाळ्यात हे धरण दोन वेळा तुडुंब भरले होते. दरवर्षी साधारण एप्रिल-मे महिन्यात धरणातील जलसाठ्यात घट होऊन सभोवतालचे पात्र कोरडे पडत असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT