Damodar Gurav Dainik Gomantak
गोवा

Goa: सावंत यांच्या राजीनाम्यानंतर दामोदर गुरव सरपंच पदाच्या शर्यतीत

मिळालेल्या माहितीनुसार विद्यमान उपसरपंच दामोदर गुरव (Damodar Gurav) यांची सरपंचपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमन्तक

डिचोली: कारापूर-सर्वण पंचायतीचे सरपंच तथा मयेचे आमदार प्रवीण झांट्ये (MLA Praveen Jhantye) यांच्या खास मर्जीतील गोकुळदास सावंत यांनी सरपंचपदाचा राजिनामा दिल्याने या पंचायतीत आता सरपंच बदल अटळ आहे. मिळालेल्या माहितीनुसार विद्यमान उपसरपंच दामोदर गुरव (Damodar Gurav) यांची सरपंचपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.

तीन महिन्यापूर्वी गोकुळदास सावंत यांची सरपंचपदी निवड झाली होती. मागील मार्च महिन्यात झालेल्या पोटनिवडणुकीत गोकुळदास सावंत पंच म्हणून निवडून आल्यानंतर लगेचच एप्रिल महिन्यात त्यांची पंचायतीच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाली होती. सरपंच म्हणून निवडून येताच त्यांनी आमदार प्रवीण झांट्ये यांच्या सहकार्याने पंचायतीत विविध उपक्रम हाती घेतले. अल्पावधीत त्यांनी सरपंचपदाचा राजिनामा दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असल्या, तरी त्यांनी स सामंज्यसपणा दाखवून सरपंचपदाचा राजिनामा दिल्याचे समजते.

दामोदर गुरव यांना संधी

गोकुळदास सावंत यांच्यापूर्वी उज्वला कवळेकर यांनी सरपंचपदाचा राजिनामा दिला होता. त्यावेळी सत्ताधारी गटातील अंतर्गत करारानुसार दामोदर गुरव यांचा सरपंचपदाचा कार्यकाळ ठरला होता. मात्र सत्ताधारी गटाने गोकुळदास सावंत यांना संधी दिली. आता दामोदर गुरव यांना सरपंचपदाची संधी मिळावी. यासाठीच गोकुळदास सावंत यांनी सरपंचपद सोडले आहे. त्यातच दामोदर गुरव यांनी गुरुवारी भाजप प्रवेश केल्याने कारापूर-सर्वणचे नवे सरपंच म्हणून दामोदर गुरव यांची निवड होणार असल्याचे जवळपास निश्चित आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT