वीज पडून निकामी झालेला विजेचा मीटर  Dainik Gomantak
गोवा

रावण, सत्तरी येथे घरावर वीज पडून नुकसान

टीव्ही, मिक्सर, इस्त्री, विजेचा मीटर, विजेची वहिनी व अन्य साहित्याचा समावेश

Dainik Gomantak

Goa: गोव्यात सध्या पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे रावण (वरचावाडा), सत्तरी (Sattari) येथील गितेश जयराम गावस यांच्या घरावर वीज (Lightning Strike) पडून घरातील विजेवर चालणारी सर्व उपकरणे जळून निकामी झाली. बुधवारी 3 नोव्हेंबर रोजी रात्री झालेल्या गडगडावेळी वीज कोसळून सदर घटना घडली.

यात टीव्ही, मिक्सर, इस्त्री, विजेचा मीटर, विजेची वहिनी व अन्य साहित्याचा समावेश आहे. त्यामुळे सुमारे 1 लाख रुपयांचे नुकसान (Damage) झाले आहे. तसेच त्यांच्या घरा शेजारील माडाच्या झाडावर वीज पडली व माडासकट जवळील झाडे जळून गेली.

या घटनेची माहिती केरी ग्रामपंचायतीला दिली असून तलाठ्यामार्फत पाहणी करून पंचनामा करण्यात येणार असल्याचे पंचायत कार्यालयाकडून सांगण्यात आले. तसेच त्यांनी नुकसान भरपाई देण्याची मागणी मान्य केली आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून सत्तरीच्या काही भागात वीज चमकणे आणि गडागडासह जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. तसेच गडगडाट आणि वीज चमकत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वीज चमकण्याचा परिणाम संध्याकाळच्या वेळी कामातून घरी परतणाऱ्या कामगार वर्गावर पडत आहे. तसेच दिवाळीचा सणावर देखील पावसाचा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT