Goa Dairy Corruption Dainik Gomantak
गोवा

Goa Dairy: गोवा डेअरीवर युवा संचालक पाठवा

Goa Dairy: विविध डेअरी अध्यक्षांची मागणी: तोट्यातील पशुखाद्य प्रकल्प चालवण्याची तयारी

दैनिक गोमन्तक

Goa Dairy: राज्यातील एकमेव गोवा डेअरीच्या सुशासनासाठी नवीन आणि होतकरू युवा संचालक मंडळ निवडण्याची गरज असून सरकारकडून वेळोवेळी सहकार्य केले जात असल्याने सद्यःस्थितीत गोवा डेअरी तग धरून आहे, असे फोंड्यात तीन दूध संस्थांच्या अध्यक्षांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

फोंड्यातील या पत्रकार परिषदेला गोवा वेल्हा येथील दूध संस्थेचे अध्यक्ष रमेश एडातडन, पीर्ण दूध संस्थेचे अध्यक्ष गोविंद नाईक व अभिनव दूध संस्था डिचोलीचे गुरुदास परब उपस्थित होते.

राज्यातील विविध ठिकाणी असलेल्या दूध संस्था जर नफ्यात असतील, तर मग अशा दूध संस्थांचे प्रतिनिधी गोवा डेअरीवर संचालक म्हणून गेल्यानंतर गोवा डेअरी तोट्यात का जाते, असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला.

गोवा डेअरी ही राज्यातील दूध उत्पादकांची शिखर संस्था असून गोवा डेअरीची वाढ झाली पाहिजे, पण गोवा डेअरीवर येणाऱ्या संचालक मंडळाकडून गोवा डेअरीच्या वृद्धीसाठी कोणतेच प्रयत्न झाले नाहीत.

गोवा डेअरीवरील नोकरांची खोगीरभरती आणि चुकीचे निर्णय यामुळे गोवा डेअरीची वाताहत होण्यास कारण ठरले आहे. सरकारकडून गोवा डेअरी सावरण्यासाठी वेळोवेळी साहाय्य केले जाते.

आताही गोवा डेअरीवर असलेल्या प्रशासकीय समितीने बरेच चांगले निर्णय घेतले आहेत. त्यामुळेच गोवा डेअरीचे नुकसान घटले आहे. गोवा डेअरी नफ्यात येण्यासाठी नवीन होतकरू, युवा आणि अनुभव असलेले संचालक डेअरीवर येणे आवश्‍यक असून त्यादृष्टीने सर्व दूध संस्थांच्या प्रतिनिधींनी प्रयत्न करावेत, असे रमेश एडातडन म्हणाले.

गोवा डेअरीच्या पशुखाद्य प्रकल्पाची वाताहत झाली आहे. पशुखाद्य प्रकल्पाला पुरवण्यात येणाऱ्या कच्चा मालाची बिले थकल्यामुळे हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. पशुखाद्य प्रकल्पाची सुमारे तेरा कोटींच्या बिलांचा हा प्रश्‍न असल्यामुळे पशुखाद्य प्रकल्प तोट्यात गेला.

सद्यःस्थितीत काही दूध संस्थांनी पुणेस्थित पशुखाद्य प्रकल्पाकडून माल खरेदी करण्यासंबंधी कार्यवाही सुरू केली आहे. विद्यमान प्रशासकीय समितीने खर्चात कपात करताना वीज तसेच पाण्याच्या बिलाचे योग्य नियोजन केले असल्याने या समितीचे कार्य चांगले असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

पशुखाद्य प्रकल्पासाठी दूध संस्थांचा पुढाकार

गोवा डेअरीचा उसगाव येथील तोट्यात असलेला पशुखाद्य प्रकल्प चालवण्यासाठी राज्यातील दहा दूध संस्थांनी पुढाकार घेतला असून त्यासंबंधीचे एक निवेदन गेल्या १ फेब्रुवारीला सहकार निबंधकांना देण्यात आले आहे. सांतआंद्रे दूध सोसायटी गोवा वेल्हा, अभिनव सहकारी दूध संस्था डिचोली, जय भवानी दूध संस्था साकोर्डा, श्री शांतादुर्गा महिला दूध संस्था अडवलपाल, सेरावली दूध संस्था सालसेत, श्री सातेरी दूध संस्था इब्रामपूर, पीर्ण दूध संस्था पीर्ण - बार्देश, नानोडा दूध संस्था नानोडा - डिचोली, श्री महादेव दूध संस्था बाजारमळ बेतोडा फोंडा, मेरशी दूध संस्था, मेरशी - गोवा या दहाही दूध संस्थांतर्फे सहकार निबंधकांना हे निवेदन दिले असून पीपीपी तत्त्वावरील सरकारच्या आवाहनानुसार हे निवेदन देण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोवा म्हणजे फक्त Sun, Sand, Sea नाही! पर्यटनमंत्र्यांचा 'गेम-चेंजिंग' मास्टरस्ट्रोक, परशुरामाचा भव्य प्रकल्प बनणार नवी ओळख

PM Modi Diwali Celebration With Jawan's: ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा जल्लोष! पंतप्रधान मोदी गोव्यात नौदलाच्या सैनिकांसोबत साजरी करणार यंदाची दिवाळी

IND vs AUS ODI: कांगारुंची दाणादाण उडवायला टीम इंडिया सज्ज, पहिल्या वनडेत कोणत्या 11 शिलेदारांना मिळणार संधी? गिल-रोहित सलामीला, मग जैस्वालचं काय?

Goa News: रामा कानकोणकर हल्ला प्रकरण; झेनिटो कार्डोझोला २ दिवसांची पोलिस कोठडी

Narkasur in Goa: 20 फुट उंच, अक्राळ-विक्राळ डोळ्यांचा महाकाय! जगात सापडणार नाही असा अनुभव; कुठे बघाल 'नरकासुर दहनाचा' थरार?

SCROLL FOR NEXT