Bodgeshwar Jatra 2024: बोडगेश्वर जत्रोत्सवातून 15 लाख महसूल

Mapusa Bodgeshwar Jatra 2024 : प्रिया मिशाळ: कपडे, खेळणे, खाद्यपदार्थांची 600 दुकाने
Bodgeshwar Jatra 2024: 15 Lakh Revenue From Bodgeshwar Jatrotsav In Mapusa
Bodgeshwar Jatra 2024: 15 Lakh Revenue From Bodgeshwar Jatrotsav In MapusaDainik Gomantak
Published on
Updated on

Bodgeshwar Jatra 2024 News:

म्हापसा (Mapusa) येथील देव बोडगेश्वर जत्रोत्सव फेरीतून म्हापसा पालिकेने सोपो आणि कचरा कराच्या रूपात सुमारे 15 लाख रूपयांचा महसूल प्राप्त केला आहे. यंदा 13 दिवस चाललेल्या जत्रेतून स्टॉल्स आणि विक्रेत्यांकडून हा कर पालिकेले वसूल केला, अशी माहिती नगराध्यक्ष प्रिया मिशाळ यांनी दिली.

देव बोडगेश्वर यांच्या वार्षिक जत्रेत मंदिराच्या आवारात उभारलेल्या फेरीमध्ये सुमारे 600 पेक्षा जास्त दुकाने उभारली होती. त्यात खाजे, कपडे, खेळणी, भांडी व इतर वस्तूंसह खाद्य पदार्थांच्या स्लॉल्सचा समावेश होता. शिवाय मनोरंजक खेलांचा मोठा सेटअप होता ज्यात जायंट व्हील, ड्रॅगन ट्रेन, स्लाईड्स आणि इतर क्रियाकलापांचा समावेश होता.

Bodgeshwar Jatra 2024: 15 Lakh Revenue From Bodgeshwar Jatrotsav In Mapusa
Goa Farming: मयेत शेतीसाठी तिळारीचे पाणी

यावेळी पालिकेने फेरीतील दुकानांना सोपोचा कराचा दर प्रति रनिंग मीटर ८०० रूपये असा ठरविला होता. यामध्ये कचरा कराचाही समावेश होता. बोडगिणी येथे १३ दिवस चाललेल्या या भव्य जत्रेच्या अखेरीस म्हापसा नगरपालिकेने वरील दरानुसार १५ लाखांचा महसूल गोळा केला आहे.

Bodgeshwar Jatra 2024: 15 Lakh Revenue From Bodgeshwar Jatrotsav In Mapusa
Ponda Road Problem: चर खोदल्याने फोंड्यात वाहतूक कोंडी

चार लाखांची भर!

यावर्षी पालिका कर्मचाऱ्यांनी चांगल्यापैकी कामगिरी करत बोडगिणी जत्रेतून १५ लाखांचा महसूल जमा केला. गेल्यावर्षी पालिकेने ११ लाख रूपये महसूल गोळा केला होता. यंदा यात ४ लाखांची अतिरिक्त भर पडली. या १५ लाखांच्या रकमेत कचरा कराचाही समावेश आहे, असे मिशाळ म्हणाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com