Goa Dairy Dainik Gomantak
गोवा

गोवा डेअरीचं दूध महागण्याची शक्यता

अमूलपाठोपाठ गोवा डेअरीचे दूध दरवाढीचे संकेत

दैनिक गोमन्तक

पणजी : गुजरात मिल्क फेडरेशनने अमूल दुधाच्या दरात वाढ केल्यानंतर आता गोवा डेअरीनेही दूधदरात मोठी वाढ करण्याच्या तयारीत आहे. यामुळे गोमंतकीयांच्या खिशाला मात्र कात्री लागणार आहे. अमूलने मंगळवारी आपल्या दूधदरात प्रतिलीटर दोन रुपयांनी वाढ केली आहे. (Goa Dairy News Updates)

गोवा (Goa) डेअरीच्या त्रिसदस्यीय समितीचे अध्यक्ष आगोस्टिनो मिस्किटा यांनी दूधदराच्या वाढीचे संकेत दिले आहेत. येत्या 10 किंवा 11 मार्चरोजी बैठक घेऊन त्यात दूध दरवाढीचा निर्णय घेण्यात येईल असं मिस्किटा यांनी स्पष्ट केलं आहे. गोवा डेअरीच्या दूधाच्या दरवाढीचा प्रस्ताव आला असून दरवाढ करायची की नाही यावर आठवड्याभरात होणाऱ्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. मात्र असं असलं तरीही दूध (Milk) दरवाढीची टांगती तलवार गोमंतकीयांच्या डोक्यावर राहणारच आहे.

गोवा डेअरीकडून (Goa Dairy) सध्या फुल क्रीम म्हशीचं दूध, शक्ती दूध, गायीचं दूध, आणि टोन्ड दूध अशा चार प्रकारात दुधाची विक्री केली जाते. सध्या फुल क्रीम दुधासाठी 55 रुपये प्रतिलिटर, शक्ती दुधासाठी 50 रुपये, गायीच्या दुधासाठी 46 रुपये आणि टोन्ड दुधासाठी 44 रुपये प्रतिलीटर मोजावे लागतात. गोवा डेअरीकडून दरदिवशी अंदाजे 55 हजार लीटर दुधाची विक्री स्थानिक बाजारात केली जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Baina Beach: बायणा किनारा 30 वर्षांसाठी भाड्याने देण्याचा प्रस्ताव रद्द; स्थानिकांच्या विरोधाला यश

भारतासाठी टेन्शन फ्री बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियन तेल खरेदीवरील कडक निर्बंध हटवले; 100 टक्के टॅरिफचा धोका टळला

Smart Meter Scheme: स्मार्ट वीज मीटरवर मानवाधिकार आयोगाचा हिरवा कंदील; तरी गोव्यात योजना तूर्तास स्थगितच

Horoscope: नवरात्रीच्या सातव्या दिवशी देवी कालरात्रीची कृपा! मेष ते मीन, 12 राशींचे आजचे राशिभविष्य; कोणाला मिळणार धनलाभ?

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

SCROLL FOR NEXT